‘नरेगा’ घोटाळ््याची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 21:42 IST2019-05-04T21:41:54+5:302019-05-04T21:42:41+5:30
पाढंरकवडा पंचायत समितीत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात ५४ कोटींच्या अपहाराची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमकी दिली जात आहे. या घोटाळ््यात अधिकाऱ्यांसह उपसभापती, काही सदस्य सहभागी असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केला.

‘नरेगा’ घोटाळ््याची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमक्या
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाढंरकवडा पंचायत समितीत ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात ५४ कोटींच्या अपहाराची तक्रार केल्याने पंचायत समिती सभापतींना धमकी दिली जात आहे. या घोटाळ््यात अधिकाऱ्यांसह उपसभापती, काही सदस्य सहभागी असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी शनिवारी येथे पत्रपरिषदेत केला.
पाढंरकवडा पंचायत समितीमध्ये २०१६ ते २०१८ या कालावधीत अनेक अनियमितता करून मनमानी पद्धतीने रोहयोेचा निधी लाटला. प्रशासकीय मंजुरी नसताना कामे केली. गरज नसताना अनेक गावात सिमेंट काँक्रिट नाल्या, सार्वजनिक विहिरी, नादुरूस्त विहिरी यासह अनेक कामांची बनावट कागदपत्रे तयार केली आहे. सरपंचांच्या खोट्या सह्या मारून व्यवहार केला. बीडीओंच्या संगनमताने अपहार झाल्याचा आरोप बोरले यांनी केला. या प्रकरणाची सभापती इंदुताई मिसेवार यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, रोहयो आयुक्त यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना धमकविण्यात येत आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या कंत्राटदारांनी सभापती महिलेच्या मुलांना मारहाण केली. या प्रकरणात पोलिसांनी दोघांवर गुन्हे दाखल केले. दरम्यान, चौकशी समितीत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर नाल्हे यांचा समावेश आहे.
संगनमताने अधिकारी, पदाधिकारी यांनी मोठा अपहार केला. अडकणार, असे दिसताच त्यांनी आता तक्रारकर्त्यांना धमकाविणे सुरू केले. सभापतींच्या मुलाला सोशल मीडियावरून जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. मात्र या प्रकरणात पांढरकवडा ठाणेदार दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप बोरेले यांनी पत्रकार परिषदेत केला.
पत्रपरिषदेला सभापती इंदुताई मिसेवार, बाजार समिती सभापती जानुसेठ जीवाणी, मदन जिद्देवार, सांभारेड्डी येल्टीवार, दीपकअण्णा कापर्तीवार, राजू बोरेले, नीलेश ठाकरे, मस्जीद भाई, विलास गोडे आदी उपस्थित होते.
सोशल व स्पेशल आॅडिटची मागणी
रोहयोच्या कामाचे सोशल व स्पेशल आॅडीटची मागणी केली आहे. कामांच्या आराखड्याची तपासणी व्हावी, यासाठी निवेदन दिले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून उपविभागीय अधिकारी एस. भुवनेश्वरी यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. पहिल्यांदाच पंचायत समितीतील रेकॉर्ड सिल झाले आहे. यात उपसभापतीच्या कक्षातील कपाटाचा समावेश आहे.