शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

५९० गावे झाली तंटामुक्त

By admin | Updated: May 19, 2014 23:54 IST

गावगाड्यातील तंटे समोपचाराने मिटवून गावागावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यात

यवतमाळ : गावगाड्यातील तंटे समोपचाराने मिटवून गावागावात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ५९० गावे संपूर्ण तंटामुक्त झाली आहे. गावांमध्ये स्थापन झालेल्या तंटामुक्त समित्यांनी तब्बल १९ हजार तंटे समोपाराने मिटविले आहे. या योनेंतर्गत गावातच तंटे मिटत असल्याने न्यायालयाचे उंबरठे झिजविण्यासोबतच होणार्‍या आर्थिक आणि मानसिक त्रासापासून या योजनेने दिलासा दिला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मोहिमेचे अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अश्विन मुद्गल व पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी नियोजनपूर्वक काम केल्याने जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ५९० गावे पूर्णपणे तंटामुक्त झाली आहे. यापैकी १२९ गावांचे मूल्यमापन झाले असून घोषणा तितकी शिल्लक आहे. पूर्वीच्या या गावांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य शासनाच्यावतीने पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. तर यापैकी सात गावांना विशेष पुरस्कार देण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण १२०७ ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायतींच्या ठिकाणी तंटामुक्त गाव समित्या स्थापन झाल्या आहे. गावकर्‍यांना तंटामुक्त मोहिमेचे महत्त्व कळावे तसेच योजनेची योग्य अंमलबजावणी होऊन तंटे समोपचाराने सोडविण्यासाठी सर्व गावांना शासन निर्णय व त्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेले आदेश गावकर्‍यांपर्यंत पोहचूवन त्याबाबत गावकर्‍यांना मार्गदर्शन करण्यात येते. गावगाड्यात निर्माण झालेल्या वादातून प्रकरण पोलिसात जाते व नंतर न्यायालयात प्रकरणाची सुनावणी सुरू होते. यासाठी तक्रारकर्ते व ज्यांच्या विरोधात तक्रार आहे अशांना पोलीस ठाणे व नंतर न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागते. न्यायालयात अनेक वर्ष प्रकरण सुरू राहात असल्याने दोनही पक्षांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तंटामुक्त अभियानाने मात्र या सर्व बाबींपासून गावकर्‍यांची सुटका केली आहे. या योजनेचे महत्त्व पटल्याने गावकरी स्वत:हून आपले छोटे-मोठे तंटे तंटामुक्त गाव समितीसमोर ठेवून ते निकाली काढून घेत असल्याचे चांगले चित्र गावागावात पाहावयास मिळते. गावकर्‍यांमध्ये झालेली जनजागृती व प्रशासनाच्यावतीने होत असलेल्या योग्य अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील अनेक गावातच या योजनेच्या माध्यमातून सोडविण्यात आले आहे. पहिल्या वर्षी तंटामुक्त झालेल्या गावांना २५ लक्ष रुपये बक्षिसाच्या रूपात वितरित करण्यात आले. दुसर्‍या वर्षी २००८-०९ मध्ये दोन कोटी २४ लाख, २००९-१० मध्ये एक कोटी १४ लाख, २०१०-११ मध्ये तीन कोटी ८९ लाख, २०११-१२ मध्ये दोन कोटी २३ लाख इतकी रक्कम गावांना वितरित करण्यात आली. २०१२-१३ मधील १२९ गावांची घोषणा झाल्यानंतर त्या गावांनाही रक्कम वितरित केली जातील. या रकमेतूनही गावात विकासाची कामे करण्यास मोलाचा हातभार लागला आहे. (शहर प्रतिनिधी)