राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात झाली मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:13+5:30

यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या बाजुला असलेली हॉटेल, बार कित्येक दिवस बंदच होती.

There was a big drop in accidents on national highways | राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात झाली मोठी घट

राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात झाली मोठी घट

ठळक मुद्देलॉकडाऊन व संचारबंदीचा परिणाम । रस्त्यावरील वाहतुकही रोडावली, स्टंटबाजी करणाऱ्यांवर बसला अंकूश

लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पोलिसांचे प्रयत्न होऊनही नियंत्रणात न येणाऱ्या दुर्घटनांना लॉकडाऊन तसेच अनलॉकमध्ये आळा बसल्याचे दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावर अपघताची संख्या निम्म्यावर आली असून त्यात मृत्यू झालेल्यांची संख्या घटली आहे.
यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर तालुक्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर अनलॉकमध्येही नियम जास्त शिथिल न झाल्याने रस्त्यावरील वाहतुकही रोडावली आहे. शिवाय स्टंटबाजी करणाऱ्यावर अंकुश बसला आहे. तसेच रस्त्यांच्या बाजुला असलेली हॉटेल, बार कित्येक दिवस बंदच होती. याचाही परिणाम तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावरील अपघातावर दिसून येत आहे. जानेवारी ते जून अखेरपर्यंत तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पाच मोठे अपघात झाले. त्यात पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.
इतर किरकोळ अपघतात सातजण जखमी झाले. मात्र मागील २०१९ मध्ये याच कालावधीचा अपघाताचा व मृत्यूची संख्या अधिक आहे.
त्याचप्रमाणे राज्य मार्गावरील अपघाताचे तसेच मृत्यूचे प्रमाणही मागीलवर्षीच्या जानेवारी ते जून २०१९ च्या तुलनेत लॉकडाऊन व अनलॉकच्या काळात निम्म्यावर आले आहे.
प्रतिवर्षी पावसाळा सुरू होताच अपघाताची मालिका सुरू होते. त्याला रस्त्यावर पडलेले खड्डेच कारणीभूत असतात. राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य मार्गावर केवळ रहदारी मर्यादीत असल्याने प्राणांतिक अथवा गंभीर अपघात घडले नाहीत.

Web Title: There was a big drop in accidents on national highways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात