सामाजिक शांततेला नख लावणाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 10:40 PM2018-09-14T22:40:58+5:302018-09-14T22:41:40+5:30

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांसोबतच नागरिकांचीसुद्धा आहे. त्यामुळे सामाजिक शांततेला नख लावणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा गर्भित इशारा अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी दिला.

There is no end to social peace | सामाजिक शांततेला नख लावणाऱ्यांची गय नाही

सामाजिक शांततेला नख लावणाऱ्यांची गय नाही

Next
ठळक मुद्देउपमहानिरीक्षक : नेर, यवतमाळात आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांसोबतच नागरिकांचीसुद्धा आहे. त्यामुळे सामाजिक शांततेला नख लावणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा गर्भित इशारा अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी दिला.
महानिरीक्षक तरवडे शुक्रवारी दुपारी यवतमाळात आले होते. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्याकडून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. गणेश विसर्जन मिरवणुकांदरम्यान घ्यावयाच्या दक्षतेबाबत काही टीप्स् तरवडे यांनी दिल्या. तत्पूर्वी त्यांनी अमरावतीवरून येताना संवेदनशील नेर पोलीस ठाण्यात भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी ठाणेदार अनिल किनगे व अधिकाºयांशी चर्चा केली. गणेश विसर्जनाचे मार्ग, या मार्गावरील अन्य धर्मियांच्या प्रार्थना स्थळ परिसरात घ्यावयाची काळजी, याबाबत सूचना देण्यात आल्या. गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्याचे आवाहन उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी केले. त्यांनी पोलीस ठाण्याचाही फेरफटका मारला. ठाण्यातील दारू गोळ्याची तपासणी करण्यात आली. नेर शहरात ४२ व ग्रामीण भागात ७६ सार्वजनिक मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली.

Web Title: There is no end to social peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.