१५ केंद्रांवर ४० टक्केही मतदान नाही

By Admin | Updated: October 16, 2014 23:30 IST2014-10-16T23:30:35+5:302014-10-16T23:30:35+5:30

मतदानाच्या बाबतीत शहरी मतदार नेहमीच उदासीन राहिला आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा बुधवारी झालेल्या विधानसभेच्या मतदानातील टक्केवारीतून दिसून येते. यवतमाळ शहर व लगतच्या

There are 40 percent polling in 15 centers | १५ केंद्रांवर ४० टक्केही मतदान नाही

१५ केंद्रांवर ४० टक्केही मतदान नाही

यवतमाळ : मतदानाच्या बाबतीत शहरी मतदार नेहमीच उदासीन राहिला आहे. याचा प्रत्यय पुन्हा एकदा बुधवारी झालेल्या विधानसभेच्या मतदानातील टक्केवारीतून दिसून येते. यवतमाळ शहर व लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये तब्बल १५ केंद्रांवर ४० टक्केही मतदान झाले नाही. या उलट तालुक्यातील आदिवासीबहुल गावात ७५ टक्क्यापेक्षा अधिक मतदान झाले.
शहरात राहून साधन सुचितेच्या गप्पा हाणणारे मतदानाच्या बाबतीत मात्र नेहमीच मागे राहतात. देशाची व्यवस्था कशी राहावी यावर घसा कोरडा करणाऱ्यांकडून मतदानाचा हक्क बजावलाच जात नाही. यवतमाळ नगरपरिषद क्षेत्रात सरासरी ५० टक्के इतके मतदान झाले आहे. यातही झोपडपट्टी आणि मागास भाग म्हणून परिचित असलेल्या मतदान केंद्रांवर ६५ ते ७० टक्के मतदान झाले आहे.
यवतमाळ तालुक्यातील कापरा मेथड येथील दोन्ही मतदान केंद्रांवर ७९ टक्के मतदान झाले. त्यानंतर किटा, बोरगाव, मडकोना, डोर्ली, इचोरी जांबवाडी, तपोना, चाणी, वारजई, बोथबोडन, गहुली हेटी, सावरगड, येरद, चिचघाट, घोडखिंडी, हिवरी, पाथ्रडदेवी, पार्डी नका, कोळंबी, कारेगाव, यावली, गाजीपूर, सायखेडा, वडगाव आंध, वागद खु., वडगाव गाढवे, बोरीगोसावी, हादगाव, रामवाकडी, यावली, रामनगर, मांजर्डा येथे ७५ ते ८० टक्के मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी उत्साहाने मतदान केले. या उलट यवतमाळ शहरातील १०७ मतदान केंद्रांपैकी सहा मतदान केंद्रांवर प्रचंड निरुत्साह दिसून आला. येथे ३५ ते ३८ टक्केच मतदान झाले. नगरपरिषद क्षेत्रातील ही सहा मतदान केंद्रे क्र. १५६, १६०, १६३, १७०, १९९, २२२ ही आहे. या प्रमाणेच लगतच्या वाघापूर, लोहारा आणि वडगाव रोड येथील काही केंद्रावरही अशीच स्थिती आढळून आली.
महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सुशिक्षित नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. मात्र हाच वर्ग आपल्या कर्तव्यापासून दूर राहात असल्याचे दिसते. यवतमाळ विधानसभेत एकूण तीन लाख ४३ हजार ३७८ मतदार आहे. यापैकी दोन लाख एक हजार ४४७ मतदारांनी हक्क बजावला. यात ९३ हजार ३६५ स्त्रियांनी मतदानासाठी पुढाकार घेतला.
त्यांची मतदान टक्केवारीही ५६.५२ इतकी आहे. या उलट पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ६०.६७ इतकी आहे. यावरून महिलांमध्येही मतदानाबाबत अजून जागृती करण्याची गरज असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभेत सर्वात कमी मतदान जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ विधानसभा क्षेत्रात झाले आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: There are 40 percent polling in 15 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.