शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

अंमलदाराची दुचाकी चक्क ठाण्यातून पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2022 5:00 AM

पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली. ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात उभी केलेली दुचाकी (एमएच-२९-एक्स-६१०४) घेण्यासाठी गेले. त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ :   बुधवारी पहाटे १९ वर्षीय चोरट्याने अवधूतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन दुचाकीचे लॉक तोडले. ती दुचाकी घेऊन तो पसार झाला. डायरी अंमलदार असलेल्या पोलीस नाईक कर्मचाऱ्याची ही दुचाकी होती. सकाळी ड्युटी संपल्यानंतर दुचाकी चोरी गेल्याचे उघडकीस आले. पोलीस ठाण्यात रात्रपाळीमध्ये पोलीस नाईक विनोद बानते हे डायरी अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. सकाळी त्यांची ड्युटी संपली. ते घरी जाण्यासाठी ठाण्याच्या आवारात उभी केलेली दुचाकी (एमएच-२९-एक्स-६१०४) घेण्यासाठी गेले. त्यांना त्यांची दुचाकी मिळून आली नाही. ठाण्यातून दुचाकी चोरी गेली यावर बानते यांचा विश्वास बसत नव्हता. शेवटी त्यांनी पोलीस ठाण्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. त्यामध्ये चोरीचा पूर्ण घटनाक्रम कैद झाला. टीशर्ट घातलेला एक युवक  ठाण्यात आला. त्याने  दुचाकींचे लॉक उघडण्याचा प्रयत्न केला. पोलीस येतील याचा अंदाज येताच तो पोलीस ठाण्याच्या बाहेर आला. नंतर त्याने ठाणेदाराच्या कक्षामागून अरुंद बोळातून पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला. तेथे बानते यांच्या दुचाकीचे लॉक तोडले व  दुचाकी घेऊन पसार झाला. हा घटनाक्रम पाहिल्यानंतर पोलिसांनी चोराचा शोध घेणे सुरू   केले. बुधवारी दुपारी एक वाजता दुचाकी चोरणारा सुरेश ऊर्फ जादू नरेश कलांडे (वय १९, रा. पारवा) हा पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याने हातावर ब्लेडने वार केले होते. स्वत:च्या आईच्या विरोधातच तक्रार देण्यासाठी ठाण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेला दुचाकी चोर हाच आहे हे लक्षात येताच पोलिसांनी जादूला ताब्यात घेतले. काही वेळाने त्याची आई अनिता कलांडे ही पाेलीस ठाण्यात पोहोचली. मुलगा व्यवस्थित राहत नसून, तो वाद करून खोटी तक्रार देण्यासाठी आल्याचे तिने पोलिसांना सांगितले. तसेच त्याने दुचाकी घरी आणल्याचेही सांगितले. मुलाचा कायमचा बंदोबस्त करा, त्याला कारागृहाबाहेर पडू देऊ नका, असे आर्जव अनिता कलांडे यांनी अवधूतवाडी पोलिसांकडे केले. 

होय गाडी चोरली, पोलीस माझे काय बिघडविणार- सराईत चोर असलेल्या सुरेश ऊर्फ जादू कलांडेने चोरीची दुचाकी घेऊन पारवा  गाव गाठले. गावात जाऊन त्याने सर्वांना सांगितले, पोलीस माझे काहीच वाकडे करणार नाही, पोलिसाचीच दुचाकी  ठाण्यातून आणली आहे असे म्हणून जादूने स्वत:च्या आईसोबतच वाद घालणे सुरू केले. आधार कार्डासाठी टीसी हवी या कारणावरून तो आई व बहिणीसोबत भांडत होता. जादूच्या कारनाम्यामुळे कलांडे कुटुंबीय त्रस्त झाले आहेत. त्याने सायकल चोरीपासून गुन्ह्याची सुरुवात केली आहे. 

 

टॅग्स :Thiefचोर