धावत्या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक ठार, परिसरात हळहळ
By विलास गावंडे | Updated: March 21, 2023 17:46 IST2023-03-21T17:46:00+5:302023-03-21T17:46:28+5:30
सुनील गाडेकर हे वाही करून घराकडे परत निघाले होते, मार्गात असलेल्या खड्ड्यात त्यांचे ट्रॅक्टर उसळले.

धावत्या ट्रॅक्टरखाली चिरडून चालक ठार, परिसरात हळहळ
बाभूळगाव (यवतमाळ) : धावते ट्रॅक्टर खड्ड्यातून उसळले. स्टिअरिंगवरून हात सुटल्याने चालक खाली कोसळला. चाकाखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी बाभूळगाव तालुक्यातील खर्डा येथे घडली. सुनील नागोराव गाडेकर (वय ४०, रा. खर्डा), असे मृत चालकाचे नाव आहे.
तालुक्यात शेतीची वाही सुरू आहे. ट्रॅक्टरद्वारे कामे केली जात आहे. सुनील गाडेकर हे वाही करून घराकडे परत निघाले होते. मार्गात असलेल्या खड्ड्यात त्यांचे ट्रॅक्टर उसळले. खाली पडून ते चाकाखाली आले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. नागोराव गाडेकर यांच्या तक्रारीवरून बाभूळगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मंगळवारी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून त्यांचा मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला.