शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

नाल्याच्या पुरातून मृतदेह न्यावा लागतो अंत्यसंस्कारासाठी, ​​​​​​​माळकिन्ही येथील गंभीर प्रकार

By रवींद्र चांदेकर | Updated: September 8, 2022 20:53 IST

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही स्मशानभूमी नाही

यवतमाळ : देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे देशातील ग्रामीण भागात चक्क नाल्याच्या पुरातून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी न्यावा लागतो. महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे हे भयावह वास्तव बुधवारी उघड झाले.

ग्रामीण भागात कुठे स्मशानभूमी अभावी, तर कुठे दहन शेडअभावी मृतदेहांवर उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागतात. मृत्यू झालेल्या माणसांचा शेवटचा प्रवाससुद्धा खडतर होतो. याचे ताजे उदाहरण तालुक्यातील माळकिन्ही येथे बुधवारी दिसून आले. हे गाव भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणून महाराष्ट्रात नावारूपास आले आहे. परंतु, तेथील स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाइकांना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नाल्याच्या पुरातून वाट काढावी लागते.

माळकिन्ही येथील अविनाश कलाने (वय ४०) यांचा उपचारांदरम्यान ५ सप्टेंबरला शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गावी आणला. त्यावेळी दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. अंत्यसंस्कार करण्यासाठी इतरत्र जागा नसल्याने नाल्याच्या पैलतीरावर असलेल्या दहनशेडमध्ये अंत्यसंस्कार करण्याचे नातेवाइकांनी ठरविले. परंतु पाऊस थांबता थांबेना. पावसामुळे नाल्याला जोरदार पूर आला होता. नाल्याच्या पैलतीरावर जाण्यासाठी रस्ता किंवा पूल नसल्याने व अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळ होत असल्याने नातेवाइकांनी मृतदेह घेत एकमेकांच्या साहाय्याने छातीपर्यंत पाणी असलेल्या नाल्याच्या पुरातून वाट काढली. मृतदेह पैलतीरावर नेऊन अंत्यसंस्कार केले.  ​​​​​​​लोकप्रतिनिधींविरुद्ध गावकऱ्यांमध्ये रोषमाळकिन्ही हे गाव हिंगोली लोकसभा व उमरखेड विधानसभा क्षेत्रात येते. खासदार हेमंत पाटील व आमदार नामदेव ससाणे हे दोन्ही लोकप्रतिनिधी गावकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

स्मशानभूमीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना नाल्याकाठी अंत्यविधी करावा लागतो. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्यांना अनेकदा निवेदन दिले. मात्र, अद्याप सुविधा उपल्बध झाली नाही.गजानन काळे,उपसरपंच, माळकिन्ही

स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे केली. मात्र, मागणी अद्याप धूळ खात आहे.शीतल लहाने, सरपंच, माळकिन्ही