शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या फलकाला यवतमाळात फासले काळे; मराठा आंदोलकांची धरपकड

By सुरेंद्र राऊत | Updated: October 30, 2023 14:20 IST

शासन आपल्या दारी कार्यक्रम : परिस्थिती गंभीर, पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण

यवतमाळ : येथे शासन आपल्या दारी अभियानांतर्गत ३५ हजार शेतकऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेेळाव्याला उपस्थित राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फलक लागले आहे. यातच मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून सोमवारी सकाळी आर्णी मार्गावरील फलकावर काळे फासले तर काही ठिकाणी काही फलक फाडण्यात आले. मुख्यमंत्री येणार त्या मार्गावरील फलकाला काळे फासल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. 

शासन आपल्या दारी कार्यक्रमात मराठा आंदोलक निदर्शने करतील याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पोलिसांनी प्रमुखांची धरपकड सुरू केली आहे. मराठा आंदोलकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या फलकाला काळे फासल्यानंतर हे फलक काढण्यासाठी नगरपालिकेची यंत्रणा तातडीने कामाला लागली. मुख्यमंत्री येईपर्यंत आर्णी मार्गावरील असे सर्व फलक काढण्याचे काम सुरू होते. एकूणच परिस्थिती गंभीर असून पोलिस प्रशासनावर प्रचंड ताण आला आहे. 

शेतकरी मेळाव्याला गर्दी जमविण्यासाठी प्रत्येक गावातून एसटी बसेस  बोलविण्यात आल्या. महागाव, उमरखेड, पुसद या तालुक्यांमध्ये काही गावात मराठा आंदोलकांनी या बसेसला प्रवेश नाकारला. त्यामुळे एसटी बसेस रिकाम्याच परतल्या. सातत्याने घडामोडी सुरू असल्याने पोलिसांची प्रचंड धावपळ होत आहे. ३५ हजारांच्या जमावात मराठा आंदोलक ओळखायचे कसे हेही आव्हान पोलिसांपुढे आहे. पाणी, जेवण न मिळाल्याने महिला शेतकऱ्यांचा संताप

शासन आपल्या दारी अभियानासाठी गर्दी जमविण्याचे शासकीय कर्मचाऱ्यांना टार्गेट देण्यात आले. सकाळी केळापूर तालुक्यातून महिला शेतकऱ्यांची बस कार्यक्रमस्थळी आली. मात्र त्यांना दुपार होऊनही साधे पाणी, जेवणही मिळाले नाही. यामुळे संतापलेल्या महिलांनी एसटी बस परत काढा आम्हाला गावी नेऊन सोडा, अशी मागणी केली. यातच बसमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यासोबत महिलांचा वाद झाला. महिलांनी यावेळी आपला संताप व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शिवाय मुख्यमंत्र्यांंना मुंबईतून येण्यास उशीर होत असल्याने येथे आणलेल्या नागरिकांचा संयम सुटू लागला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणEknath Shindeएकनाथ शिंदेYavatmalयवतमाळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार