शहरं
Join us  
Trending Stories
1
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
2
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
3
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
4
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
5
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
6
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
7
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
8
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
9
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
10
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
11
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
12
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
13
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
14
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
15
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
16
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
18
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
19
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
20
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा

सीसीआयकडे कापूस उत्पादकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 10:03 PM

शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयने सोमवारी वणी येथे कापूस खरेदीचा मुहूर्त शोधला खरा; पण पहिल्याच दिवशी कापूस उत्पादकांनी सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली.

ठळक मुद्देउद्घाटनाला केवळ १६ क्विंटलची खरेदी : खासगी व्यापाºयांचा दर हमी भावापेक्षा अधिक

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयने सोमवारी वणी येथे कापूस खरेदीचा मुहूर्त शोधला खरा; पण पहिल्याच दिवशी कापूस उत्पादकांनी सीसीआयच्या खरेदीकडे पाठ फिरविली.सोमवारी दुपारनंतर उद्घाटनाला केवळ दोन वाहनात भरलेला कापूस विक्रीसाठी पोहचला. ही दोनही वाहने मिळून सीसीआयने हमीभावाने १६ क्विंटल ४५ किलो कापूस खरेदी केला. या उलट खासगी व्यापाºयांनी शासकीय हमीभावापेक्षा चढ्या भावात कापूस खरेदी केला. त्यामुळे येथील एका खासगी बाजार समितीत सात हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली.शासकीय कापूस खरेदीच्या पहिल्याच दिवशी वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शुकशुकाट दिसून आला. सीसीआयतर्फे कापूस खरेदीच्या उद्घाटनाची तयारी करण्यात आली. सुरूवातीला एक ते दोन शेतकरी कापूस घेऊन बाजार समितीत पोहचले. मात्र नव्या नियमानुसार या शेतकºयांकडे आॅनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रेच नसल्याने सदर शेतकºयांना आल्या पावली परत जावे लागले. त्यानंतर दुपारी ३ वाजता कापसाने भरलेली केवळ दोन वाहने वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहचली. येथील महावीरा अ‍ॅग्रीकेअर या खासगी बाजार समितीत मात्र कापूस उत्पादकांची रिघ लागली होती. यंदा कपाशीला प्रती क्विंटल चार हजार ३२० रुपये हमी भाव असताना खासगी बाजार समितीत व्यापाºयांनी १२ टक्के आर्द्रतेवर चार हजार ३५० ते चार हजार ३८० रुपये प्रती क्विंंटल भाव दिला. सीसीआयतर्फे कपाशीला प्रती क्विंटल चार हजार ३२० रुपये हमी भाव दिला जात आहे. हा दर आठ टक्के आर्द्रता असेल तरच दिला जाणार आहे. त्यापेक्षा कपाशीत जास्त आर्द्रता असेल तर हमी भावानुसारच कापूस खरेदी केली जाणार की, दरात कपात करणार, याबाबत सीसीआयने गुप्तता पाळली आहे. मागील वर्षी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीत २० पैसे सेस आकारण्यात येत होता. तो २ डिसेंबर २०१६ पर्यंत सुरू होता. त्यामुळे खासगी व्यापाºयांची येथे कापूस खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यानंतर ३ डिसेंबर २०१६ पासून ५० पैसे सेस आकारण्यात आला. मात्र बाजार समितीने सेस कमी करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याने त्याला मंजूर मिळून सेस कमी होईल, या आशेने खासगी व्यापाºयांनी याच ठिकाणी कापूस खरेदी केली. त्यामुळे मागील वर्षी वणी कृषी उत्पन्न बाजार समितीतत विक्रमी साडेबारा लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी झाली. मात्र ५० पैसे सेस आकारण्यात आल्याने, कापूस व्यापाºयांनी हा सेस परवडणारा नसल्याचे कारण देत वणी बाजार समितीकडे पाठ फिरविली आहे.सोयाबीन खरेदीची शेतकºयांना प्रतीक्षादिवाळीचा सण झाल्यानंतरही नाफेडने अद्याप सोयाबीन खेरदीचा मुहूर्त शोधला नाही. त्यामुळे शेतकºयांना नाईलाजाने कमी भावात खासगी व्यापाºयांना सोयाबीन विकावे लागत आहे. सोमवारी बाजार समितीत शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. सोयाबीनचा हमीभाव तीन हजार ५० रुपये असला तरी खासगी व्यापाºयांनी २६५० ते २७०० रुपये दराने सोयाबीनची खरेदी केली.