पुष्पकुंजमध्ये भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:00 AM2020-05-24T05:00:00+5:302020-05-24T05:00:13+5:30

पुष्पकुंज सोसायटीत नाल्याच्या काठावर रऊफभाई यांचा गादी कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये साडेतीन लाख रुपये किंमतीची मशीन, २४ गाद्या, रुई, कापड, दुकान व साहित्य जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले. याच कारखान्याला लागून पालिकेच्या अग्नीशमन विभागातील फायरमन अजय गुजरे यांचे कच्चे घर आहे. तेथे पाणीपुरी विकणारे भाड्याने राहतात. त्यांच्या पाणीपुरीच्या दोन गाड्या तीन लाख रुपये किमतीच्या जळून खाक झाल्या.

Terrible fire in the Pushpakunj | पुष्पकुंजमध्ये भीषण आग

पुष्पकुंजमध्ये भीषण आग

googlenewsNext
ठळक मुद्देगादी कारखाना जळाला । दोन गॅस सिलिंडरचा स्फोट, दोन दुचाकी जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : स्थानिक आर्णी रोडवरील पुष्पकुंज सोसायटीत शनिवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडर लिक असल्याने भीषण आग लागली. यावेळी शेजारील पाणीपुरीवाल्याकडे असलेले एक गॅस सिलिंडर फुटल्याने आग आणखीनच वाढली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
पुष्पकुंज सोसायटीत नाल्याच्या काठावर रऊफभाई यांचा गादी कारखान्यात लागलेल्या आगीमध्ये साडेतीन लाख रुपये किंमतीची मशीन, २४ गाद्या, रुई, कापड, दुकान व साहित्य जळून खाक झाले. यात दुकान मालकाचे लाखोंचे नुकसान झाले. याच कारखान्याला लागून पालिकेच्या अग्नीशमन विभागातील फायरमन अजय गुजरे यांचे कच्चे घर आहे. तेथे पाणीपुरी विकणारे भाड्याने राहतात. त्यांच्या पाणीपुरीच्या दोन गाड्या तीन लाख रुपये किमतीच्या जळून खाक झाल्या. या घरालाही आग लागली.
यावेळी घरात असलेल्या महिला व मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या आगीत सिलिंडरचा स्फोट झाला. आगीची माहिती मिळताच यवतमाळ नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाचे दोन बंब दाखल झाले. परंतु त्यापैकी एकात पाणीच नसल्याने या बंबला ऐनवेळी पाणी भरण्यासाठी जावे लागले. गादी कारखान्याच्या बाजूने असलेल्या अ‍ॅक्वा व अन्य दुकानांनाही आगीचा फटका बसला. विशेष असे या आगीत भक्ष्यस्थानी सापडलेले घर हे अग्नीशमन विभागात कार्यरत कर्मचाऱ्याचेच आहे.
अग्नीशमनच्या कर्मचाऱ्यांनी तीन बंब पाण्याचा वापर करून या आगीवर नियंत्रण मिळविले. टीनपत्र्याचे लाकडी बल्ल्या लावलेले घर असल्याने पूर्णत: जळून खाक झाले. टीनपत्रे काढून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. वृत्तलिहिपर्यंत संपूर्ण आग आटोक्यात आली होती. या आगीत झालेले नुकसान हे २० लाखांच्या घरात असल्याची माहिती घरमालक अजय गुजरे यांनी ‘लोकमत’ला दिली

अग्नीशमन विभाग कर्मचाºयाचेच घर आगीच्या भक्ष्यस्थानी
शनिवारी सकाळी १०.३० वाजता फायरमन अजय गुजरे यांच्या घरी गॅस सिलिंडर लिक असल्याने त्याचा स्फोट झाला. यातून आग लागली. आगीने घरासमोर भाड्याने राहणाºया पाणीपुरी विक्रेत्यांच्या खोल्यांनी पेट घेतला. तेथील एक सिलिंडर आगीत गरम होवून फुटले. यामुळे आग आणखीच भडकली. यातच गादी कारखान्याने पेट घेतला. गुजरे यांच्याकडे भाड्याने राहात असलेले भाडेकरी अभिलाख सिंग अख्तर सिंग, विजय हराळ या पाणीपुरी विक्रेत्यांच्या दोन गाड्या व घरातील साहित्य जळून खाक झाले. घरात ठवेलेल्या दोन दुचाकीही जागेवरच राख झाल्या. एका पाठोपाठ दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने पुष्पकुंज सोसायटीचा परिसर दणाणला.

Web Title: Terrible fire in the Pushpakunj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग