कापूस जिनिंगला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:16+5:30

अचानक आग लागल्याने कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापसाची वाहने जिनिंगच्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी एकच हल्लकल्लोळ उडाला. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले.

Terrible fire to cotton ginning | कापूस जिनिंगला भीषण आग

कापूस जिनिंगला भीषण आग

googlenewsNext
ठळक मुद्देपणनचे कापूस खरेदी केंद्र : शेतकऱ्यांची झाली प्रचंड धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील एमआयडीसीत पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र असलेल्या गायत्री जिनिंगमध्ये रविवारी दुपारी आग लागली. या आगीत गोदामात ठेऊन असलेली सरकी जळून खाक झाली. अचानक आग लागल्याने कापूस विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. कापसाची वाहने जिनिंगच्या परिसरातून बाहेर काढण्यासाठी एकच हल्लकल्लोळ उडाला. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाने तत्काळ घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले.
गायत्री जिनिंगमध्ये पणन महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू आहे. सध्या शेतकरी घरातील कापूस विकण्यासाठी मोठ्या प्रमाणात केंद्रावर येत आहे. कापसाची खरेदी सुरू असतानाच अचानक जिनिंगमधील सरकीच्या गोदातून धूर निघू लागला. परिसरात वाहनांची व शेतकऱ्यांची मोठी गर्दी होते. आग लागल्याचे निदर्शनास येताच सर्वांची धावपळ सुरू झाली. नगरपरिषदेच्या अग्नीशमन बंबाला पाचारण करेपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. जिनिंगच्या परिसरात कापूस गाठी, कापूस मोठ्या प्रमाणात ठेऊन होता. जिनिंग सुरू असताना शॉर्टसर्किट अथवा ठिणगी उडाल्याने ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. आगीची घटना माहीत होताच लोहारा ठाणेदार सचिन लुले ताफ्यासह दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी घटनास्थळाला भेट दिली. वृत्तलिहिस्तोवर आगीवर बºयापैकी नियंत्रण मिळविता आले होते. प्रत्येक जण आग विझविण्यासाठी धडपड करीत होता.

२२०० कापूस गाठी वाचल्या
जिनिंग परिसरात २२०० कापूस गाठी ठेऊन होत्या. तर पणन महासंघाने खरेदी केलेला तीन हजार क्विन्टल कापूसही याच ठिकाणी ठेवण्यात आला होता. आग सरकीच्या गोदामापुरतीच नियंत्रणात ठेवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले. अन्यथा कापूस गाठी व तीन हजार क्विन्टल कापूस जळून खाक झाला असता.

Web Title: Terrible fire to cotton ginning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग