खंडाळा घाटात यवतमाळला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; एक मृत्यू तर २५ प्रवासी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 11:51 IST2020-10-21T11:51:34+5:302020-10-21T11:51:49+5:30
पुणे ते यवतमाळ महालक्ष्मी ट्रॅव्हल्स वाशिमकडून पुसदकडे येणारी ट्रॅव्हल यवतमाळला जाणार होती.

खंडाळा घाटात यवतमाळला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात; एक मृत्यू तर २५ प्रवासी जखमी
पुसद (यवतमाळ): ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या खंडाळा घाटात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये ड्रायव्हरचे वळणाचे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पुणे ते यवतमाळ महालक्ष्मी ट्रॅव्हल्स वाशिमकडून पुसदकडे येणारी ट्रॅव्हल यवतमाळला जाणार होती. पण हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये २० ते २५ प्रवासी जखमी असून १७ प्रवाशावर येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा अपघात सकाळी ८ ते ८.३० वाजता दरम्यान झाला.