शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दुकान गाळ्यांवर भाडेकरू मालामाल

By admin | Updated: October 13, 2014 23:27 IST

गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा

मारेगाव : गेल्या १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायत प्रशासनाने बेरोजगारांसाठी शहरात बांधलेले दुकान गाळे अल्प दराने भाड्याने घेऊन तेच गाळे आता जादा दराने इतरांना भाड्याने देऊन घरबसल्या पैसे कमाविण्याचा उद्योग काहींनी सुरू केला आहे़तालुक्यातील बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी येथील ग्रामपंचायतीने शहरात आंबेडकर चौकालगत दुकान गाळे काढले़ त्यावेळी अत्यल्प आणि नाममात्र ५०० रूपये दरमहा भाड्याने ही दुकान गाळे बेरोजगार तरूणांना भाड्याने देण्यात आली़ तेथे त्यांनी आपला व्यवसाय सुरू करून ते आत्मनिर्भर व्हावे, असा हेतू यामागे होता. युवकांना त्यामुळे रोजगार मिळून ते बेरोजगार राहू नये, अशी भावना होती. या खाळ्यांमुळे त्यांच्या कुटुंबाला उदरनिवार्हाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यावेळी बहुतांश बेरोजगार तरूणांनी या गाळ्यात दुकाने थाटून रोजगार मिळविण्याचा प्रयत्नही केला़ परंतु अनेकांना आपल्या व्यवसायात अपयश आल्याने त्यांनी आपले व्यवसाय बंद केले़ मात्र त्यांनी ग्रामपंचायतीच्या या गाळ्यांवरील ताबा अद्याप सोडला नाही़ ज्या बेरोजगार तरूणांना व्यवसायात अपयश आले, त्यांनी आता नवीन फंडा शोधून काढला़ ग्रामपंचायत प्रशासनाकडून केवळ ५०० रूपये दरमहा भाड्याने घेतलेले हे दुकान गाळे, आता या बेरोजगारांनी दुसऱ्यांना परस्पर चढ्या भावाने भाड्याने दिले अहेत. ग्रामपंचायत भाड्यापोटी दरमहा केवळ ५०० रूपये जमा करून वरील पाच हजारांच्यावर रूपये या तरूणांना काहीही न करता मिळत आहेत. त्यामुळे दुकान टाकण्यापेक्षा हा धंदा बरा, अशी प्रवृत्ती यांच्यात वाढली आहे़ या गाळेधारकांपैकी काहींनी रोजगाराचा हा दुसरा मार्ग स्वीकारला आहे़ तरीही अद्याप ग्रामपंचायतीने या गाळेधारकांकडील दुकान गाळे परत घेतले नाहीत़ मारेगाव शहरात दुकान गाळ्याची कमतरता आहे़ अनेक बेरोजगार तरूण दुकान गाळे शोधत आहे़ एखादे दुकान गाळे भाड्याने घ्यायचे म्हटले, तर पगडी म्हणून लाखो रूपये जमा ठेवावे लागतात़ दरमहा भाडेही भरपूर असते़ त्यामुळे या बेरोजगार तरूणांची कुचंबना होत आहे़ दुसरीकडे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणाने काही बेरोजगार काहीही न करता घरबसल्या हजारो रूपये दर महिन्याला कमावत आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाने भाड्याने दिलेले सर्व गाळे ताब्यात घेऊन नव्याने या गाळ्यांचा लिलाव करावा, अशी मागणी बेरोजगार तरूणांकडून होत आहे़ (शहर प्रतिनिधी)