वनखात्याने दिली तेंदूपत्ता मालकी
By Admin | Updated: January 10, 2015 02:11 IST2015-01-10T02:11:15+5:302015-01-10T02:11:15+5:30
यावर्षी वनखात्याने तेंदूपत्ता तोडाई निविदामध्ये महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित आदिवासी खेड्यातील तेंदुपत्ता तोडाई ग्रामसभेला दिली आहे.

वनखात्याने दिली तेंदूपत्ता मालकी
यवतमाळ : यावर्षी वनखात्याने तेंदूपत्ता तोडाई निविदामध्ये महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित आदिवासी खेड्यातील तेंदुपत्ता तोडाई ग्रामसभेला दिली आहे. या सर्व दोन हजारांवर आदिवासी अनुसूचित खेडयांची तेंदुपत्ता तोडाई राज्यपालांच्या आदेशावरून ग्रामसभा करणार असून या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत तेंदुपत्ता मजूर समितीने केले आहे.
तेंदूपत्ता मजुर समितीचे तेंदुपत्ता तोडाई व मालकीचा हक्काचा लढा मागील दशकात रेटला होता व आता त्याला संपूर्ण यश येत असल्याचे समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ३४० गावात ग्रामसभेमार्फत तेंदुपत्ता तोडाई व विक्रीचा प्रस्ताव ग्रामीण मंत्रालयाला दिला असून यामध्ये केळापूर तहसीलमधील मोहदरी ,जोगीण कवला, मीरा, जीरा, घोडदरा, सखी बुद्रुक, वाढोणा खुर्द, करंजी, वाढोणा, द्रुक, तिवसाला (वन गाव),कोठोडा, सुरदेवी, चनई, असोली, मोह्दा, कारेगाव, चिखलदरा, कृष्णापूर, धाबा, मोरवा ,खैरगाव, वाघोली, कुसळ, चोपण, मलकापूर (वन गाव), केगाव, वडनेर, झुली, भाड उमरी, पहापळ , नागेझरी खुर्द, बहात्तर , सुसरी, पेंढरी पिप्पलि, डोंगरगाव, दोन्ही, मालेगाव खुर्द, दयार्पूर हिवरी पिम्पल शेंडा, कारेगाव, वळवाट, खैरी, घुबडी, गनेरी, भीमकुंड, ठाणेगाव, कोन्घारा, साखरा बुद्रुक, धारणा मंगी, ढोकी, वाई, मप्लापूर, गणेशपूर, खैरगाव, निलजाई, मारेगाव, अंभोरा, डोंगरगाव, पिंपरी, खैरगाव, मुची, मानगुरडा, पंधावार्नी बुद्रुक (वन गाव), कोंधी , वेडत, बग्गी घनमोड, नांदगाव, गणेशपूर तातपुर , झुन्जार्पूर गोंड वाकडी , चालबर्डी , बेलोरी ताड उमरी, बोर गाव, अकोली बुद्रुक, महान डोली, साखरा, मराठ्वाक्डी, ढोकी, बल्लारपूर, टोक वांजरी, वांजरी खैरगाव बुद्रुक, टेंभी, वासरी अंधारवादी, चाणका, रूढा, सुकली आदींचा समावेश आहे.
मारेगाव व झरी तालुक्यातील आदिवासी गावांची नावे गोकुलधारा, शिवनाला, बुरांडा, पहापळ, न्हाळगाव, खेकडवाई, घोडधरा, नरसाळा, धामणी मदनापूर, बोरीखुर्द, पिसगाव वडगाव, फिसकी (वन गाव), भालेवाडी, पाथरी चिंचनाळा, पांढरकवडा, खर्डा, पिमरड (वन गाव), फापरवडा सालेभट्टी (वन गाव), डोंगरगाव माचिन्द्र पानवीरा, जळका, पांढरदेवी, अम्बोरा (वनगाव), चीन्चोनी बोटोनी, आवळ गाव (वनगाव) आदींसह इतरही गावांचा समावेश आहे.
यासर्व आदिवासी खेड्यात तेंदूपत्ता मजूर समिती प्रचार करुन ग्रामसभा बोलावून तेंदूपत्ता मजुरांचे प्रशिक्षण करणार असल्याची माहिती सुद्धा किशोर तिवारी यांनी कळविली आहे. (प्रतिनिधी)