शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

ठाणेगाव शाळेत शिक्षकांना डांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:03 AM

तालुक्यातील ठाणेगाव येथील पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मंगळवारी शाळेतच केंद्र प्रमुखासह शिक्षकांना डांबले. तब्बल सहा तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

ठळक मुद्दे१५ दिवसांपासून शाळेला कुलूप : अपुऱ्या शिक्षकांमुळे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यातील ठाणेगाव येथील पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी मंगळवारी शाळेतच केंद्र प्रमुखासह शिक्षकांना डांबले. तब्बल सहा तासानंतर त्यांची सुटका करण्यात आली.ठाणेगाव येथील शाळेत शिक्षक नसल्याने पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने पालकांनी ६ आॅगस्टला शाळेला कुलूप ठोकले. तेव्हापासून शाळा बंद आहे. स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही पालकांनीच ध्वजारोहण करून साजरा केला. शिक्षकांच्या मागणीसाठी पंचायत समितीत गेलेल्या पालकांना हाकलून लावण्यात आले, असा आरोप आहे. पंचायत समितीने दोन साधन व्यक्तींची तात्पुरती नियुक्ती केली. ते गावातील चावडीत मुलांना शिकवित आहे. मंगळवारी केंद्र प्रमुख गलाट यांच्यासोबत आडे नावाचे शिक्षक तेथे पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांना ठोस आश्वासन न दिल्याने गावकऱ्यांनी त्यांच्यासह साधन व्यक्ती संजय पवार, चेतन पंधरे या चौघांना तब्बल सहा तास डांबून ठेवले.अखेर सहायक बीडीओ मंगेश आरेवार, साधना चौधरी, पारवा ठाणेदार यांनी गावात पोहोचून शिक्षक देण्याची ग्वाही दिली. आरेवार यांनी गावकऱ्यांना तसे लेखी आश्वासन दिले. यामुळे शांत झालेल्या पालकांनी अखेर चौघांची सुटका केली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन सुरपाम, पोलीस पाटील नविता मारपवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :Teacherशिक्षकPoliceपोलिस