शिक्षकांना यावेळीही १ तारखेला वेतन मिळाले नाही
By Admin | Updated: October 3, 2016 00:20 IST2016-10-03T00:20:03+5:302016-10-03T00:20:03+5:30
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना १ तारखेला वेतन मिळालेच नाही. वित्त व लेखा विभागाच्या दिरंगाईमुळे वेतन न मिळाल्याने

शिक्षकांना यावेळीही १ तारखेला वेतन मिळाले नाही
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना १ तारखेला वेतन मिळालेच नाही. वित्त व लेखा विभागाच्या दिरंगाईमुळे वेतन न मिळाल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने संताप व्यक्त केला आहे.
प्राथमिक शिक्षकांना शासन निर्णयानुसार दरमहा १ तारखेला वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील आठ पंचायत समितीमधील शिक्षकांना सप्टेंबर महिन्यात आॅगस्टचे वेतन १ तारखेला अदा करण्यात आले होते. आठ पंचायत समितीमधील शिक्षकांना ते उशीरा मिळाले. यानंतर किमान सप्टेंबरचे तरी वेतन १ आॅक्टोबरला मिळेल, अशी शिक्षकांची अपेक्षा होती. मात्र शनिवारी १ आॅक्टोबरला त्यांना वेतन मिळालेच नाही.
लेखा व वित्त विभागाने पंचायत समिती स्तरावर संबंधित गटविकास अधिकाऱ्यांच्या खात्यात पैसेच जमा केले नाही. परिणामी शिक्षकांना १ आॅक्टोबरला वेतन मिळू शकले नाही. यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या शिष्टमंडळाने त्वरित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यांच्याकडे मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडली नाही, असा आरोप केला. याप्रकरणी कॅफो व इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांविरूद्ध त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक सेनेचे रवींद्र कोल्हे, प्रकाश सालपे, जगदीश ठाकरे, महेंद्र वेरूळकर, कैलास काळे, गजानन हागोणे, बाबा घोडे, विशाल भोयर, गजानन गिरी, प्रदीप शेळके आदींनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)