शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

शिक्षकदिन ठरला आंदोलन दिन, हार तुऱ्याच्या दिवशी झळकल्या काळ्या फिती

By अविनाश साबापुरे | Published: September 05, 2023 6:10 PM

जिल्हा परिषदेपुढे शिक्षकांनी केली घोषणाबाजी

यवतमाळ :शिक्षकांच्या सन्मानार्थ साजरा केल्या जाणारा शिक्षक दिन यंदा आंदोलनांचा दिवस ठरला. शासनाच्या शिक्षक विरोधी भूमिकांचा कडवा विरोध करीत जवळपास सर्वच शिक्षक संघटनांनी मंगळवारी आंदोलने केली. सध्या राष्ट्रीय कार्याच्या नावाखाली शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामाची सक्ती करण्यात येत आहे. शासनाच्या या सक्तीच्या, अशैक्षणिक कामाच्या निषेधार्थ रोष व्यक्त करण्यात आला.

यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी घोषित केल्याप्रमाणे सामूहिक रजा आंदोलन केले. समितीचे जिल्हाध्यक्ष पुंडलीक रेकलवार, जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे, कार्याध्यक्ष रवींद्र उमाटे, जिल्हा शिक्षक नेते ज्ञानेश्वर नाकाडे, गजानन देऊळकर आदींच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेपुढे येऊन नारे देण्यात आले.त्याचवेळी यवतमाळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाच्या (२३५) वतीने शिक्षक दिनी काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला.

या आंदोलनात कार्याध्यक्ष आसाराम चव्हाण, शशिकांत खडसे, गजानन मडावी, सतीश मुस्कंदे, संजय फाळके, श्रीराम जिड्डेवार, अजय अक्कलवार, प्रवीण कापर्तीवार, मनीष नाकतोडे, गणेश चव्हाण, संजय वनकर, दिलीप हातगावकर, सचिन इंगोले, सुरेश भितकर, अनुप कोवे, कुशल समरित, विलास राठोड, प्रवीण जाधव, गजानन क्षीरसागर, सुभाष चव्हाण, हितेश राठोड, समरित, रंजना पाळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने निषेध आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून शिक्षक दिनी ‘आम्हाला फक्त शिकवू द्या’ अशी हाक देत काळ्या फिती लावून कामकाज केले. यावेळी जिल्हा परिषदेसह ठिकठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. यवतमाळ जिल्ह्यात शिक्षक नेते मधुकर काठोळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश उदार, जिल्हा सरचिटणीस विठ्ठलदास आरू, राज्य उपाध्यक्ष सुभाष धवसे यांच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनagitationआंदोलनTeacherशिक्षकYavatmalयवतमाळ