शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

वणी येथील शिक्षकाला १४ लाखांनी गंडा; ऑनलाइन केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 12:39 IST

Yavatmal : शेअर मार्केटमधून काळ्या यादीत टाकण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कवणी (यवतमाळ) : येथील एका शिक्षकाला कमी किमतीत शेअर मिळवून देण्याचे आमिष दाखवून अज्ञात भामट्याने १३ लाख ६७ हजारांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. किशोर ओंकार चौधरी, असे फसगत झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचे नाव असून, ते वणीतील गुलमोहर पार्कमधील रहिवासी आहेत. त्यांनी वणी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बारकलेस सिक्युरिटी कंपनीतील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी महिलेने किशोर चौधरी यांच्याशी व्हॉटस्अॅपवरून चॅटिंग करून ५० टक्के डिस्काउंट रेटवर आयपीओ सबस्क्राइब करून देण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी प्रायमरी ट्रेडिंग अकाऊंट काढण्यासाठी एका कंपनीचे मोबाइल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावरून चौधरी यांनी संबंधित अॅपद्वारे टप्प्या-टप्प्याने १३ लाख ६७हजार रुपये जमा केले. यानंतर या अॅपमध्ये वेळोवेळी चौधरी यांनी जमा केलेली रक्कम दर्शविल्यात जात होती.

तसेच या रकमेचा वापर करून त्यांनी करावयास सांगितलेल्या ट्रेडद्वारे चौधरी यांच्या प्रायमरी शेअर मार्केट अकाउंटमध्ये ४४ लाख ६५ हजार ५७४ रुपयांची रक्कम जमा असल्याचे दिसत होते. त्यानंतर संबंधित ग्रुपच्या महिला अॅडमिनने चौधरी यांना पुन्हा नवीन येऊ घातलेल्या एका कंपनीच्या आयपीओला सब्स्क्राइब करण्यास सांगितले. मात्र, चौधरी यांनी आता आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. जर आयपीओचे पैसे न भरल्यास काय होऊ शकते, याविषयी विचारणासुद्धा केली. तेव्हा आरोपींनी फिर्यादीस काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये जेवढे पैसे आहेत, तेवढ्याच पैशाचे शेअर मिळत असल्याचे सांगितले; परंतु ५ मार्च रोजी चौधरी यांच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये एकूण ५९ लाख ६५ हजार रुपयांचे आयपीओ अलॉट झाल्याचा मेसेज आला. तेव्हा चौधरी यांनी आरोपी महिलेला याबाबत सांगितले.

शेअर मार्केटमधून काळ्या यादीत टाकण्याची धमकीआरोपी महिलेने काही तरी करू, असे सांगितले आणि नंतर ६ मार्च रोजी चौधरी यांना उर्वरित १५ लाख रुपये भरणा करण्यास सांगितले. पैसे न भरल्यास आतापर्यंतची पूर्ण रक्कम म्हणजेच ४४ लाख ६५ हजार ५७४ रुपये कंपनी ब्लॉक करील आणि चौधरी यांना प्रायमरी शेअर मार्केटमधून काळ्या यादीत टाकले जाईल, असे सांगितले. त्यामुळे चौधरी यांना हा प्रकार संशयास्पद आला.

आरोपींनी १८ फेब्रुवारीपासून ६ मार्चपर्यंत चौधरी यांची १३ लाख ६७हजार ५७४ रुपयांनी ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे चौधरी यांनी या संदर्भात वणी पोलिस ठाण्यात तक्रार केली. फिर्यादी यांच्या लेखी तक्रारीवरून सदरचा गुन्हा नोंद असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले करीत आहेत. 

टॅग्स :YavatmalयवतमाळMONEYपैसाfraudधोकेबाजी