लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शाळांमधील शिक्षकांची कमतरता असताना जिल्हा प्रशासन शिक्षकांना बीएलओची जबाबदारी देत आहे. या अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी, अशी मागणी करत गुरुवारी प्रहार संघटनेच्या पुढाकारात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली.बीएलओचे काम करताना शिक्षकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. मात्र वारंवार निवेदन देऊनही याबाबत दखल घेतली जात नाही, अशी खंत शिक्षकांनी व्यक्त केली. बीएलओच्या कामासाठी जाताना महिला शिक्षिकांना त्रास होतो. द्विशिक्षकी शाळा बंद पडते. जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची अनेक पदे रिक्त असताना बीएलओच्या जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान वाढत आहे, अशी व्यथा यावेळी निवेदनातून मांडण्यात आली. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगाने बीएलओच्या जबाबदारीसाठी १३ प्रकारच्या कर्मचाऱ्यांचा पर्याय सुचविलेला आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासन केवळ शिक्षकांवरच ही जबाबदारी लोटत असल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. निवेदन देतेवेळी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप डंभारे, अमोल गोपाळ, शुद्धोधन कांबळे, विलास राठोड, पुरुषोत्तम ठोकळ, माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुलसंगे, कपिल टोणे, सुनील केराम, नागेश जोगदे, किशोर मुंढे, विनोद लोखंडे, मनोज गवळी, चौधरी, अवतारे, कावळे, स्तुरी, निंबाळकर, डोहळे आदी शिक्षक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST
बीएलओचे काम करताना शिक्षकांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. मात्र वारंवार निवेदन देऊनही याबाबत दखल घेतली जात नाही, अशी खंत शिक्षकांनी व्यक्त केली. बीएलओच्या कामासाठी जाताना महिला शिक्षिकांना त्रास होतो. द्विशिक्षकी शाळा बंद पडते. जिल्हा परिषदेंतर्गत शिक्षकांची अनेक पदे रिक्त असताना बीएलओच्या जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान वाढत आहे, अशी व्यथा यावेळी निवेदनातून मांडण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांची धडक
ठळक मुद्देप्रहार संघटनेचा पुढाकार : ‘बीएलओ’ची जबाबदारी न देण्याची एकमुखी मागणी