काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा शिकवा

By Admin | Updated: February 13, 2017 01:16 IST2017-02-13T01:16:29+5:302017-02-13T01:16:29+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादीची पंधरा वर्ष सत्ता होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच काळात झाल्या.

Teach a lesson to Congress-NCP | काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा शिकवा

काँग्रेस-राष्ट्रवादीला धडा शिकवा

सुधीर मुनगंटीवार : आर्णी येथील प्रचारसभेत आवाहन
आर्णी : काँग्रेस-राष्ट्रवादीची पंधरा वर्ष सत्ता होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच काळात झाल्या. ती घाण साफ करण्यास आता आम्हाला वेळ लागत आहे. काँग्रस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करा. पंधरा वर्ष झोप घेणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला धडा शिकवा, असे आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या येथील प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री संजय देशमुख, आमदार राजू तोडसाम, भाजपा तालुकाध्यक्ष बिपीन राठोड, डॉ. संजय माळवी, श्याम झळके, बाळासाहेब चावरे, एम.टी. जाधव, दीपक वानखडे, गोवर्धन राठोड, यांच्यासह तालुक्यात उभे असलेले भाजपाचे उमेदवार उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन डॉ. व्यवहारे यांनी केले.
५७ वर्षानंतर योग आला आहे. केंद्राची विहीर आहे, राज्याची मोटार आहे, पालकमंत्र्यांचा पाईप आहे. आता त्याला काँग्रेसची जंग खाल्लेली तोटी लावू नका, असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Teach a lesson to Congress-NCP