शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

मार्च एन्डींगपूर्वी करवसुलीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST

शहरात एकूण १ लाख मालमत्ता आहेत. यात निवासी व व्यापारी संकुल, शासकीय कार्यालये यांचाही समावेश आहे. नव्याने यवतमाळ शहरात आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये २०१७-१८ च्या सर्व्हेनुसार कर आकारणी केली जात आहे. तर मुळ नगरपरिषद क्षेत्रात २०१४-१५ मध्ये झालेल्या सर्व्हेनुसार कर आकारणी केली जात आहे. आता संपूर्ण शहराच्या कर आकारणीची पुनर्रचना २०२०-२१ मध्ये होणार आहे.

ठळक मुद्देयवतमाळ नगरपालिका : १४ कोटींच्या उद्दिष्टांपैकी सात कोटींचा कर गोळा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी नगपरिषदेकडे मालमत्ता व गृह कराच्या माध्यमातूनच मोठी रक्कम येते. मात्र कर गोळा करताना पालिका प्रशासन पुरते हैराण झाले आहे. आतापर्यंत ५० टक्केच कराची रक्कम गोळा झाली आहे. वसुलीसाठी पालिकेचे अधिकारी-कर्मचारी घरोघरी पोहोचतात तेव्हा सुविधा कोणती देता, असा प्रश्न विचारून त्यांना खरीखोटी सुनवल्यानंतरच कराची रक्कम दिली जात आहे. ९ मार्चपर्यंत १४ कोटींच्या उद्दिष्टापैकी केवळ सात कोटी रूपये जमा झाले आहेत.शहरात एकूण १ लाख मालमत्ता आहेत. यात निवासी व व्यापारी संकुल, शासकीय कार्यालये यांचाही समावेश आहे. नव्याने यवतमाळ शहरात आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये २०१७-१८ च्या सर्व्हेनुसार कर आकारणी केली जात आहे. तर मुळ नगरपरिषद क्षेत्रात २०१४-१५ मध्ये झालेल्या सर्व्हेनुसार कर आकारणी केली जात आहे. आता संपूर्ण शहराच्या कर आकारणीची पुनर्रचना २०२०-२१ मध्ये होणार आहे. यावर्षी कर वसुलीत मागील वर्षीपेक्षा चांगला परफॉर्मन्स राहील, अशी आशा पालिका प्रशासनाला आहे.नगरपरिषदेच्या सामान्य फंडात गेल्या काही वर्षांपासून ठणठणाट आहे. खर्चाचा व उत्पन्नचा ताळेबंद जुळत नाही. यामुळेच नगरसेवकांना हक्काची ‘एक नाली एक रस्ता’ यासाठीही निधी नाही. इतकेच काय सामान्य फंडातून प्रस्तावित कामे करण्यास कंत्राटदार तयार नाहीत. कंत्राटदारांची देयके रखडली आहेत. केवळ १४ वा वित्तआयोग व शासन अनुदान या भरवशावर पालिकेचा डोलारा उभा आहे. मात्र स्वत:च्या उत्पन्नात वाढ करण्याचे आव्हान कायम आहे.शासकीय कार्यालये, व्यापाऱ्यांवर नजर२०१८-१९ या आर्थिक वर्षात १४ कोटींपैकी ९ कोटी ४० लाखांची कर वसुली झाली होती. आता मार्चच्या सुरूवातीलाच ७ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे यावर्षी दहा कोटींचा आकडा गाठता येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शासकीय कार्यालय व व्यापाऱ्यांकडून मार्च महिन्याच्या शेवटीच कराचा भरणा केला जातो. याच आशेवर कर विभागाचा गाडा सुरू आहे.अपुरे कर्मचारी कसे राबविणार जप्तीची मोहीम ?एकूण २७ कर्मचारी कर वसुलीत व्यस्त आहेत. येथील कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अडचणी येत आहे. सेवानिवृत्तीने रिक्त झालेली पदे भरल्याच गेली नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन कर विभाग मालमत्ता जप्तीची मोहीम राबविणार आहे. जप्तीच्या नोटीस बजावण्याची कार्यवाही कर विभागाकडून केली जात असल्याचे कर अधीक्षक दिनेश जाधव यांनी सांगितले.