शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांकडे झाडे मोजण्याचे काम

By admin | Updated: September 18, 2014 23:42 IST

शिक्षकांकडे निवडणुकीशिवाय दुसरे कोणतेही अशैक्षणिक कार्य दिले जाणार नसल्याचे शासनाने यापूर्वी घोषित केले होते. तथापि आता शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या मदतीने गावातील झाडे मोजण्याचे

अहवाल देणार : वृक्ष लागवड, संवर्धन घोटाळावणी : शिक्षकांकडे निवडणुकीशिवाय दुसरे कोणतेही अशैक्षणिक कार्य दिले जाणार नसल्याचे शासनाने यापूर्वी घोषित केले होते. तथापि आता शिक्षकांकडे विद्यार्थ्यांच्या मदतीने गावातील झाडे मोजण्याचे काम देण्यात आले आहे़ आता शिक्षक संघटना याबाबत काय भूमिका घेते, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे़मागील तीन-चार वर्षांपासून शासनाने अनेक ग्रामपंचायतींना वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र बहुतांश ग्रामपंचायतींनी या निधीचा दुरूपयोग केल्याचे शासनाच्या लक्षात आले आहेत़ ग्रामपंचायतींमध्ये एक तर निधीतून झाडे लावण्यात आली नाही, लावली असेल तर त्यापैकी एकही झाड सध्या अस्तित्वात नाही़ त्यामुळे गत चार वर्षांतील वृक्षसंवर्धन निधीच्या मोठ्या रक्कमेचा दुरूपयोग झाल्याचे दिसून येत आहे़ आता या वृक्ष घोटाळ्याची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी शाळांतील हरित सेनेचे प्रभारी शिक्षक व दोन विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे़ शालेय परिसरात वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करणे, तसेच समाजामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे, यासाठी प्रत्येक शाळेत हरित सेना नावाने शिक्षक व विद्यार्थ्यांचा समूह तयार करण्यात आला आहे़ या समूहातील शिक्षक व विद्यार्थ्यांना वृक्ष लावगडीतील कोणतीही तांत्रिक माहिती अवगत नाही़ मात्र आता या शिक्षक व विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातील गावांमध्ये मागील तीन वर्षांत लावलेली झाडे, त्यापैकी जीवंत असलेली झाडे, झाडांची उंची व त्यांची सद्यस्थिती याबाबतची माहिती संकलित करून ती १५ सप्टेंंबरपर्यंत प्रशासनाला सादर करावयाची आहे़ या संबंधी माहिती देण्यासाठी हरित सेना प्रभारी शिक्षकांची यवतमाळ येथील स्काऊट गाईड भवनात बैठक घेण्यात आली़ बैठक्ीला शिक्षणाधिकारी एस़जी़वसावे तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते़ तालुका कृषी अधिकाऱ्यांतर्फे शिक्षकांना कोणत्या गावात कोणत्या वर्षी किती झाडे लावली गेली, याची माहिती दिली जाणार आहे़ त्यापैकी किती झाडे सध्या अस्तित्वात आहे, त्यांची उंची किती आहे, याचे संकलन विद्यार्थी व शिक्षकांना करावे लागणार आहे़ शिक्षकांना आतापर्यंत माणसे मोजणे, जनावरे मोजणे ही कामे देण्यात येत होती़ त्यासोबतच आता झाडे मोजण्याचे कामही देण्यात आल्याने त्यात गुंतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे़ याविषयीची सर्व तांत्रिक माहिती असणाऱ्या वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व कृषी विभागाकडे कर्मचारी असताना या कामाची शिक्षक व विद्यार्थ्यांना जबाबदारी देणे योग्य नसल्याची कुजबूज शिक्षण वर्तुळात सुरू झाली आहे़ (स्थानिक प्रतिनिधी)