शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या अ‍ॅडमिशनऐवजी घेतले नळ कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 22:34 IST

लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले.

ठळक मुद्देनळाला थेंबभर पाणी नाहीकेवळ आश्वासनांचाच भडीमारटँकरमधून मिळते अशुद्ध पाणीदहा दिवसानंतर टँकरची फेरी

रुपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोहारा विभागातील पंचशीलनगर दलित वस्तीत पाण्याची भीषण टंचाई आहे. वर्षभरच या भागात पाण्यासाठी संघर्षाची स्थिती असते. उन्हाळ्यात या संकटाची भीषणता आणखीच वाढली आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांना पावसाळ्यात नळाचे नवीन कनेक्शन देण्यात आले. त्याकरिता मोठी रक्कम मोजावी लागली. येथील लोकांनी मुलांची अ‍ॅडमिशन न करता नळाचे कनेक्शन घेतले. पण त्या नळाला थेंबभरही पाणी आले नाही.पंचशीलनगरात पाण्याच्या व्यवस्थेकडे नगरपरिषदेचे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. टँकरची व्यवस्था झाली पण हे टँकर नऊ ते १० दिवसांनी येत आहे. मिळालेल्या टँकरमधून ड्रमभर पाणी येते. हे पाणी शेवाळलेले वास असलेले आहे. पण टंचाईकाळात नाईलाजाने ते भरून ठेवावे लागत आहे. या वसाहतीपासून जवळच औद्योगिक वसाहतीमधील गोखी पॉर्इंटचे पाणी आहे. हे पाणी शुद्ध आहे. त्या ठिकाणी दररोज टँकर जातात. मात्र आजपर्यंत हे शुद्ध पाणी पंचशीलनगरात आले नाही, असे जिजाबाई पुरी, पुष्पा भारसाकळे म्हणाल्या.या भागात दोन हापशा आणि दोन विहिरी आहेत. या विहिरींची पाणीपातळी खोल गेली आहे. यामुळे या भागातील पाण्याची निर्भरता पूर्णत: टँकरवर आहे. टँकरचे पाणी पिण्यास योग्य नाही. यामुळे पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. एका ड्रमसाठी १०० रूपये मोजावे लागतात, असे उषा मेश्राम, शांता पाल म्हणाल्या.नळाचे कनेक्शन घेण्यासाठी ७ ते १० हजारांपर्यंत खर्च आला. मात्र या ठिकाणावरून गेलेल्या पाईपलाईनला नगरातील पाईपलाईनचे आजपर्यंत कनेक्शनच जोडले नाही. यामुळे या प्राधिकरणाचे पाणी अद्याप पोहोचले नाही. लोहारा विभागाचे नळ आहे. मात्र या नळाचे कुठलेही वेळापत्रक नाही. रात्री अपरात्री पाणी सोडले जाते. किमान वेळापत्रक तरी सुधारावे, असे वंदना जगताप म्हणाल्या.आमच्या भागात पाण्याचा थेंब नाही. मात्र काही भागात सलग तीन दिवस नळ राहतात. त्याचा काय उपयोग? आम्हाला वाळीत टाकले काय? असा प्रश्नही या भागातील महिलांनी उपस्थित केला.पाहुण्यांना थांबवलेयवतमाळ शहरातील पाणीटंचाई सगळ्यांनाच माहीत आहे. यामुळे यावर्षी आम्ही येणाऱ्या नातेवाईकांना न येण्याच्याच सूचना केल्या. मिळालेले पाणी काटकसरीने वापरावे लागत असल्याचे मतही अनेकांनी नोंदविले.यवतमाळचे पाणी संसदेतयवतमाळच्या पाण्याचा विषय लोकसभा आणि विधानसभेपर्यंत गेला. पण या भागात अजूनपर्यंत पाणी आले नाही. यानंतरही प्रशासनाच्या कामाची गती ढिम्म आहे, असे म्हणत नागरिकांनी चिंता व्यक्त केली.दिवस बदलतील, असे वाटत नाहीपाणीटंचाईचा प्रश्न दरवर्षी असतो. यानंतरही आमच्या भागात पाण्याच्या ठोस उपाययोजना होत नाही. आमचे दिवस अजूनही बदलणार किंवा नाही, हे माहीत नाही. मात्र दूषित पाण्याने आमच्या भागात बिमाºया येण्याचा धोका असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई