नदीत पोहणे बेतले विद्यार्थ्याच्या अंगावर

By रवींद्र चांदेकर | Updated: September 30, 2023 19:50 IST2023-09-30T19:50:10+5:302023-09-30T19:50:30+5:30

आदर्शला पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो खोल पाण्यात जाऊन बुडाला. ही बाब काही मुलांच्या लक्षात आली.

Swimming in the river was decided on the body of the student | नदीत पोहणे बेतले विद्यार्थ्याच्या अंगावर

नदीत पोहणे बेतले विद्यार्थ्याच्या अंगावर

यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील विठोली येथील  गावालगतच्या नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी २.०० वाजताच्या सुमारास घडली.

आदर्श संजय मुनेश्वर (१२, रा. विठोली (मारोती), असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. आदर्शच्या वडिलांचा तो लहानपणी असताना मृत्यू झाला होता. त्यामुळे तो तेव्हापासून विठोली येथे आजी-आजोबांकडे राहत होता. तो पाचव्या वर्गात शिक्षण घेत होता. शनिवारी दुपारी १.०० वाजताच्या सुमारास गावातील काही मुलांसोबत आदर्श  गावालगतच्या नदीवर पोहायला गेला होता.

आदर्शला पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो खोल पाण्यात जाऊन बुडाला. ही बाब काही मुलांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केली आणि गावाकडे धाव घेतली. नंतर गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून नदीत आदर्शचा शोध घेतला. त्याचा मृतदेहच हाती लागला. आदर्शला त्वरित ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृतघोषित केले.

Web Title: Swimming in the river was decided on the body of the student