शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळमध्ये आजपासून ‘स्वर जवाहर’ महोत्सव; स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 09:56 IST

अमोलकचंद महाविद्यालय, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था आणि जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गोधनी रोडवरील अँग्लो हिंदी हायस्कूलच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा वाजता हा महोत्सव रंगणार आहे.

यवतमाळ : ‘लोकमत’चे संस्थापक संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त १० ते १२ फेब्रुवारी या कालावधीत  तीन दिवसीय ‘स्वर जवाहर’ संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.    अमोलकचंद महाविद्यालय, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था आणि जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूल, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गोधनी रोडवरील अँग्लो हिंदी हायस्कूलच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा वाजता हा महोत्सव रंगणार आहे. आज, शुक्रवारी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या ‘अनुभूती’ या फ्यूजन काॅन्सर्टने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. शनिवारी (दि.११) प्रसिद्ध सिनेपार्श्वगायिका साधना सरगम यांची लाइव्ह इन काॅन्सर्ट ही लोकप्रिय गाण्यावरील मैफल रंगणार आहे तर तिसऱ्या दिवशी रविवारी (दि.१२) जागतिक स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेले  प्रसिद्ध सतारवादक नीलाद्री कुमार यांचा ट्रॅडिशन मिट्स इनोव्हेशन हा कार्यक्रम होणार आहे. महोत्सवाची जय्यत तयारी झाली असून सुमारे ४० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या पटांगणावर पाच हजार खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. संगीत रसिकांनी या तीनदिवसीय महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाYavatmalयवतमाळ