शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत सर्वेक्षण

By admin | Updated: March 12, 2016 02:51 IST

मागासवर्ग प्रवर्गातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शासनाने कायदा केला आहे.

सचिंद्र प्रताप सिंह : जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा, भ्रष्टाचार व मनोधैर्य प्रकरणांचाही आढावा यवतमाळ : मागासवर्ग प्रवर्गातील नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी शासनाने कायदा केला आहे. जिल्ह्यात बऱ्यापैकी अशा प्रकरणांवर आळा घालण्यात आला आहे. असे असले तरी अजूनही काही गावांमध्ये अशी प्रकरणे उद्भवताना दिसतात. त्यामुळे अशी प्रकरणे थांबविण्यासाठी गावांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शुक्रवारी दिले. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्राप्त प्रकरणांवर निर्णय घेण्याठी असलेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समिती तसेच पिडीत महिला व मुलांच्या प्राप्त तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी आयोजित मनोर्धैर्य योजनेचाही आढावा घेतला.बैठकीला पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लावीर, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.निती दवे, उपविभागीय अधिकारी विकास माने, समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त विजय साळवे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्चना इंगोले, जिल्हा शल्य चिकित्सक धोटे, डॉ.लीला भेले आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा दक्षता समितीसमोर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्राप्त प्रकरणांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. प्रत्येक प्रकरणात पोलीस विभागाने जातीने लक्ष घालून कार्यवाही करावी, असे ते म्हणाले. या कायद्यांतर्गत जास्त प्रकरणे उद्भवणाऱ्या गावांचा सर्व्हे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. महिला व मुलींवर अत्याचार झाल्यास त्यांना मनोर्धेर्य योजनेंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. यावेळी झालेल्या बैठकीत सह प्रकरणे ठेवण्यात आली होती. या प्रकरणांवर चर्चा करून पात्र प्रकरणे मदतीसाठी मंजूर करण्यात आली. जिल्हा समितीसमोर भ्रष्टाचार प्रकरणात प्राप्त तक्रारींचा आढावाही जल्हाधिकाऱ्यांनी घेतला. (प्रतिनिधी)