गृहराज्यमंत्र्यांकडून पिकांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:55 IST2017-09-25T00:55:22+5:302017-09-25T00:55:38+5:30
राज्याचे नगरविकास व गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी तालुक्यातील बोपापूर येथील संजय देवाळकर यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली.

गृहराज्यमंत्र्यांकडून पिकांची पाहणी
ठळक मुद्देराज्याचे नगरविकास व गृहराज्यमंत्री रणजित पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : राज्याचे नगरविकास व गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी तालुक्यातील बोपापूर येथील संजय देवाळकर यांच्या शेतातील पिकांची पाहणी केली.
संजय देवाळकर यांनी त्यांच्या शेतात कापूस पिकाची लागवड करून पिकाचे नियोजनबद्ध संगोपन केले. वाढत्या भारनियमनाला कंटाळलेल्या स्थितीत त्यांनी शेतात सोलार सिस्टम उभारून सिंचनाची २४ तास सुविधा उपलब्ध केली. त्यामुळे त्यांना दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळत आहे. ना.पाटील यांनी या शेतात भेट देऊन पिकांची पाहणी केली. तसेच संजय देवाळकर व प्रशांत पाचभाई या शेतकºयांचा सत्कार केला. संचालन राजीव आस्वले यांनी केले.