शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सुन्ना गावात वनविभागाने घोरपड पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत सुन्ना या गावात विष्णू इस्तारी अगिलवार यांच्या घरी वन्यप्राणी घोरपड पकडून आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून आरोपी विष्णू इस्तारी अगिलवार याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घरून जिवंत घोरपड, घोरपडीचे शिजवलेले मांस, मोठ्या प्रमाणात शिकारीचे साहित्य मिळाले. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, आर/डब्ल्यू ५१ अन्वये वन गुन्हा जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआरोपीला कोठडी : वन गुन्हा नोंदविला, आरोपीकडून गावात मांस विक्री

लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सुन्ना या गावात गुरूवारी घोरपड पकडण्यात आली. यामध्ये आरोपीविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमाद्वारे वन गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला वन कोठडी सुनावण्यात आली. पांढरकवडा वनपरिक्षेत्रांतर्गत सुन्ना या गावात विष्णू इस्तारी अगिलवार यांच्या घरी वन्यप्राणी घोरपड पकडून आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून आरोपी विष्णू इस्तारी अगिलवार याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घरून जिवंत घोरपड, घोरपडीचे शिजवलेले मांस, मोठ्या प्रमाणात शिकारीचे साहित्य मिळाले. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ३९, आर/डब्ल्यू ५१ अन्वये वन गुन्हा जारी करण्यात आला आहे. आरोपींनी त्यांच्या बयाणात मांस सुन्ना येथीलच इतर व्यक्तींना विकल्याचे सांगितले. त्यावरून सुन्ना गावातूनच संजय बंडू मेश्राम व गंगुबाई पोषट्टी आत्राम यांच्याविरुद्धसुद्धा वन गुन्हा नोंदविण्यात आला.आरोपी विष्णू अगिलवार याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी विष्णू इस्तारी अगिलवार यास दोन दिवसांची वन कोठडी मंजूर केली आहे. सदर प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक के.एम. अभर्णा, सहायक वनसंरक्षक आर.के. बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता आनंदराव कोकणे करीत आहे. न्यायालयाच्या परवानगीने जप्त करण्यात आलेले जिवंत घोरपड नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. सदरची कारवाई उपवनसंरक्षक एस.कोकणे, वनपरिक्षेत्र अधिकारी पांढरकवडा व्ही.एम.दुबे, पी.व्ही.सोनुले, डी.ए.मेश्राम, शशिकांत आखरे, एस.एम.येडमे, व्ही.एस.चौधरी, आर.एस.सोनी, एस.के.आवरे यांनी पार पाडली.

टॅग्स :forest departmentवनविभाग