यवतमाळ जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 10:12 IST2019-11-15T10:11:49+5:302019-11-15T10:12:12+5:30
महागाव तालुक्यात असलेल्या मुडाणा साधूनगर येथे शुक्रवारी पहाटे १ वाजता मोहन भाऊराव राठोड (३६) या शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली.

यवतमाळ जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
नरेंद्र तप्ते
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: महागाव तालुक्यात असलेल्या मुडाणा साधूनगर येथे शुक्रवारी पहाटे १ वाजता मोहन भाऊराव राठोड (३६) या शेतकऱ्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. सतत नापिकी, परतीच्या पावसाने उध्वस्त केलेली शेती आणि डोक्यावर असलेले कर्ज याचा ताण असह्य होऊन त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. ही घटना शुक्रवारी सकाळी घरातील मंडळीच्या लक्षात आली. गावातील तलाठी ललित इंगोले यांनी पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला. मोहन राठोड यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलगा, आईवडील भाऊ व मोठा आप्त परिवार आहे.