शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

फायनान्सच्या तगाद्याने महिलेची विष घेऊन आत्महत्या

By admin | Updated: October 2, 2016 00:22 IST

खासगी फायनान्स कंपनीचे कर्मचारी वारंवार घरी येऊन कर्जाच्या पैैशासाठी धमकावत असल्याने घाबरून गेलेल्या

दोन फायनान्सचे घेतले होते कर्ज : एकाच आठवड्यात मारेगाव तालुक्यात दुसरी घटनामारेगाव : खासगी फायनान्स कंपनीचे कर्मचारी वारंवार घरी येऊन कर्जाच्या पैैशासाठी धमकावत असल्याने घाबरून गेलेल्या तालुक्यातील बोरी (गदाजी) येथील एका महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. फायनान्सच्या तगाद्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची एकाच आठवड्यात ही दुसरी घटना आहे.मंगला दादाराव आस्वले (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात फायनान्स कंपन्याचे जाळे पसरले आहे. या कंपन्या गावागावात जावून महिलांची बचत गट बनवितात व चढ्या व्याजदराने कर्जाचे वाटप करतात. या कर्जासोबतच अनेक न खपणाऱ्या वस्तू कर्जदारांच्या माथी मारून कर्जाचा आकडा फुगविला जातो. कसलेही कागदपत्र न देता घरच्या घरी कर्ज मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक महिला या कंपनीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. अनेकांनी तर एकाच वेळी तीन ते चार कंपनीकडून कर्जाची उचल केली आहे. तालुक्यातील बोरी येथील मंगला आस्वले यांनीही वणी येथील एका फायनान्स कंपनीकडून ३५ हजार, तर वरोरा येथील एका कंपनीकडून २५ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. परंतु मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाला गेल्या १५ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रोजगार मिळाला नव्हता. मजुरीचे पैैसे न मिळाल्यामुळे मंगला कर्जाचे पैैसे भरू शकली नाही. अशातच फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मंगलाच्या घरी जावून तिला धमकावले. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून मंगला धास्तावलेल्या अवस्थेत होती. अशातच शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घरातील मंडळी झोपून असताना मंगलाने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली, अशी माहिती तिचा दीर पिंटू आस्वले यांनी दिली. पोलिसांनी फायनान्स कंपनीचे कर्जाचे कागदपत्र जप्त केले. अधिक तपास ठाणेदार संजय शिरभाते यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गणेश बोंडे करीत आहे. वृत्त लिहीस्तोवर कंपनीविरूद्ध कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. (शहर प्रतिनिधी)