यवतमाळच्या व्यक्तीची लासीना येथे आत्महत्या
By विलास गावंडे | Updated: March 27, 2023 17:43 IST2023-03-27T17:42:39+5:302023-03-27T17:43:20+5:30
पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल

यवतमाळच्या व्यक्तीची लासीना येथे आत्महत्या
सोनखास (यवतमाळ) : लासीना येथील विहिरीत आढळून आलेला मृतदेह यवतमाळ येथील व्यक्तीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशांत नारायणराव भारती (४५, रा. अहिल्यानगर, यवतमाळ) असे त्याचे नाव आहे.
लासीना (ता. नेर) शिवारात असलेल्या विहिरीत नागरिकांना मृतदेह तरंगताना रविवारी आढळला. याची माहिती लासीना येथील पोलिस पाटील जितेंद्र टेकाम यांनी लाडखेड पोलिसांना दिली. ठाणेदार रामकृष्ण भाकडे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाविषयी सखोल चौकशी केली असता तो प्रशांत भारती यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे मूळ गाव पळशी (ता.दारव्हा) हे आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक टेंभरे, जमादार राजेश भगत करीत आहे.