लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील उपनगराध्यक्ष व नगरसेवकांसह विविध संघटनांनी कमान चौकातील स्वच्छतागृह सुरू करण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून उपोषण सुरू केले होते. दुसऱ्या दिवशी गुरुवारी या उपोषणाची यशस्वी सांगता करण्यात आली.नगरपरिषद उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांच्यासह नगरसेवक आणि शहरातील विविध संघटनांनी कमान चौकातील स्वच्छतागृह सुरू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली होती. समाजातील सर्वच स्तरातून या उपोषणाला पाठिंबा मिळाला. त्याची दखल घेत गुरुवारी सकाळी तहसीलदार किशोर बागडे, मुख्याधिकारी शेषराव टाले, सहायक पोलीस निरीक्षक वाळवी यांनी उपोषण मंडपाला भेट देवून भूमिगत पाईप टाकून स्वच्छतागृहाचा मार्ग काढण्याची ग्वाही दिली.तसेच या कामाला लगेच सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे यांच्यासह नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिग्रसच्या नगरसेवकांचे उपोषण यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 21:57 IST