शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिक्षकासाठी विद्यार्थ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 21:51 IST

लगतच्या सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षकाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात पालकही सहभागी झाले होते.

ठळक मुद्देसावरगाव जिल्हा परिषद शाळा : १२५ विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच शिक्षक

लोकमत न्यूज नेटवर्कपारवा : लगतच्या सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी शिक्षकाच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात पालकही सहभागी झाले होते.सावरगाव येथे दोन वर्षांपासून शिक्षकांची कमतरता आहे. शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे कित्येकदा निवेदन दिले. मात्र शिक्षण विभागाने कोणतेच पाऊल उचलले नाही. विशेष म्हणजे गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून शाळा डीजिटल केली. त्यामुळे पटसंख्येचा आलेख वाढत आहे. इंग्रजी माध्यमातील अनेक विद्यार्थी शाळेत दाखल होत आहे. यावर्षी १२५ विद्यार्थी आहे. सात वर्ग आहेत. मात्र शिक्षक केवळ दोनच आहे. यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.मागील शैक्षणिक सत्रात केवळ एकच शिक्षक होते. परिणामी पालकांनी शाळेला कुलूप ठोकले होते. त्यामुळे तीन शिक्षकांची तात्पुरती व एका कायम शिक्षकाची व्यवस्था केली होती. लवकरच स्थायी शिक्षक देण्याच्या आश्वासनानंतर कुलूप उघडण्यात आले होते. मात्र यावर्षी तात्पुरते नेमलेले शिक्षक परत आपल्या शाळेवर गेले. त्यामुळे या शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा प्राथमिक शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना ठराव दिले. त्याचा काहीच लाभ झाला नाही. यामुळे व्यवस्थापन समिती अध्यक्ष कालिदास आरगुलवार, उपाध्यक्ष प्रकाश पाटील व गावकºयांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.विद्यार्थी, पालक, गावकरी व शाळा समितीतर्फे सावरगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. समिती व पालकांनी स्थायी शिक्षक मिळेपर्यंत रास्ता रोको आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतली.दोन दिवसात शिक्षकआंदोलनाची दखल घेत पंचायत समिती शिक्षण विभागाचे विजय चौधरी, एस.पी. लाकडे यांनी सावरगाव येथे धाव घेतली. त्यांनी येत्या दोन दिवसात कायमस्वरूपी शिक्षण देण्याची लेखी ग्वाही दिली. रुजू होण्यास टाळाटाळ करणाºया शिक्षकावर कारवाईचीही ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती देवानंद पवार, शैलेश इंगोले, नितीन नार्लावार, किरण प्रधान, किशोर गोविंदवार, रोहीदास पाटील, अजय एल्टीवार, मनोज कन्नलवार, गणेश मायकलवार आदी उपस्थित होते. ठाणेदार गोरख चौधर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.