शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदपूरमध्ये विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत

By admin | Updated: October 17, 2016 01:43 IST

घाटंजी तालुक्यात आडवळणावर असलेल्या गावांमधील शिक्षणाचा खेळखंडोबा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त करणारा ठरत आहे.

शिक्षणाची दैना : एक गुरुजी रजेवर, दुसरे शिक्षक आस्थापना कामातअब्दुल मतीन  पारवाघाटंजी तालुक्यात आडवळणावर असलेल्या गावांमधील शिक्षणाचा खेळखंडोबा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन उद्ध्वस्त करणारा ठरत आहे. कुठल्याही अधिकाऱ्यांची या भागातील शाळांना चुकूनही भेट होत नसल्याने सर्व काही ठीकठाक सुरू आहे. याची परिसीमा म्हणजे चक्क विद्यार्थ्यांना गुरुजींची भूमिका पार पाडावी लागत आहे. या प्रकारात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिसरातील गोविंदपूर येथील जिल्हा परिषद शाळेची ही दैना आहे. या शाळेमध्ये ५४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पहिली ते चौथी अशा चार वर्गाला शिकविण्यासाठी दोन शिक्षक नियुक्त आहे. शिक्षणाची केवळ घोकमपट्टी सुरू आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने या शाळेला भेट दिली असता नियुक्त एकही शिक्षक हजर नव्हता. विद्यार्थीच विद्यार्थ्यांना शिकवित होते. एक शिक्षक रजेवर होते, तर दुसरे शिक्षक कार्यालयीन कामासाठी बाहेर गेले होते. विद्यार्थी शिक्षकाची भूमिका वठवित असेल, ही चांगली गोष्ट आहे. पण शिक्षक नाही म्हणून कसा तरी वर्ग सुरू ठेवायचा यासाठी शिकविण्याचा प्रकार याठिकाणी दिसून आला. एकूणच सदर शाळेत शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू असल्याचे स्पष्ट झाले. शाळांचा शैक्षणिक दर्जा तपासण्याची जबाबदारी केंद्र प्रमुखांकडे आहे. मात्र संबंधित शाळांचे केंद्र प्रमुखही या परिसरात फिरकत नसल्याचे सांगितले जाते.राजापेठ शाळेला ४ वाजता कुलूपपारवा लगतच्या राजापेठ येथील शाळेचा कारभारही अफलातून होता. दुपारी ४.१५ वाजताच या शाळेला कुलूप लागले होते. पहिली ते चौथीपर्यंत वर्ग या शाळेत आहे. शिक्षकांची मनमानी सुरू आहे. सोयीनुसार हजेरी आणि त्याच पद्धतीने शाळेला सुटी देण्याचा प्रकार याठिकाणी सुरू आहे. प्रत्यक्ष ११ ते ५ ही शाळेची वेळ असताना ४.१५ वाजतापूर्वीच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुटी दिल्याचे सांगण्यात आले. या शाळेवर कार्यरत शिक्षक सोयीच्या ठिकाणावरून ये-जा करतात. बस किंवा इतर वाहतुकीची साधने उपलब्ध व्हावी यासाठी शाळा सुटण्याच्या वेळा पाळल्या जात नाही.