शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नेर येथील शासकीय वसतिगृहातून विद्यार्थी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:46 PM

येथील शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी गेली पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याने या वसतिगृहाचा बेताल कारभार चव्हाट्यावर आणला होता.

ठळक मुद्देपाच दिवस लोटले : नेर पोलिसात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : येथील शासकीय वसतिगृहाचा विद्यार्थी गेली पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, बेपत्ता असलेल्या विद्यार्थ्याने या वसतिगृहाचा बेताल कारभार चव्हाट्यावर आणला होता.तालुक्याच्या खरडगाव येथील रहिवासी असलेला पवन नंदकिशोर टाके हा विद्यार्थी येथील दारव्हा रोडवर असलेल्या शासकीय वसतिगृहात राहून बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. पाच दिवसांपासून तो वसतिगृहात नाही. गृहपालाने या प्रकाराची माहिती पवनच्या पालकांना तीन दिवसानंतर दिली. दरम्यान, पवनचा मोबाईलही स्विच आॅफ असल्याचे सांगितले जाते. शोध लागत नसल्याने पवनचे वडील नंदकिशोर आणि गृहपालांनी शुक्रवारी पोलिसात तक्रार नोंदविली.समाज कल्याण अंतर्गत असलेल्या या वसतिगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिले जाते, बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आदी प्रकारच्या तक्रारी पवनने वरिष्ठांकडे केल्या होत्या. शिवाय विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न तो निकाली काढत होता. तो अचानक बेपत्ता झाल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थीMissingबेपत्ता होणं