उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:52 IST2019-01-06T21:52:02+5:302019-01-06T21:52:40+5:30

मराठा कुणबी समाजाची उन्नती करायची झाल्यास व्यक्तीगत विचार न करता संपूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Strategic decision making is essential for promotion | उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक

उन्नतीसाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : दारव्हा येथे राज्यस्तरीय मराठा-कुणबी परिचय मेळावा उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : मराठा कुणबी समाजाची उन्नती करायची झाल्यास व्यक्तीगत विचार न करता संपूर्ण समाज डोळ्यासमोर ठेवून धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले.
सहकार महर्षी माजी आमदार बाळासाहेब घुईखेडकर जयंती महोत्सवानिमित्त सर्व शाखेय महिला मराठा-कुणबी समाज व सांस्कृतीक मंडळातर्फे येथील मुंगसाजी महाराज महाविद्यालयात राज्यस्तरीय मराठा-कुणबी समाज उपवर-वधू परिचय मेळाव्यात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. त्यांनी ओबीसीतील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरावर वसतिगृहाची आवश्यकता असून त्यादृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. महिलांनी आयोजित केलेला राज्यातील पहिला मेळावा असून याची ‘लोकमत’ने दखल घेतल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
खासदार भावना गवळी यांनी समाजाला बलशाली बनविण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे काळजी गरज असल्याचे सांगितले. कठीण लढाईतही केवळ समाजाच्या भक्कम पाठींब्यामुळे निवडणुकीत विजय मिळविल्याचे मत खासदार मधुकरराव कुकडे यांनी व्यक्त केले. प्रथम खासदार भावना गवळी यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. मंचावर माजी खासदार राजाभाऊ ठाकरे, माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार विजयाताई धोटे, सुशीलाताई पाटील, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, वाशीम जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जीवन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, उत्तमराव शेळके, सुभाष ठोकळ, मनीष पाटील, नानाभाऊ गाडबैले, तातू देशमुख, अशोक बोबडे, अरुण राऊत, राजेंद्र पाटील, पुष्पा नागपुरे,राम देवसरकर उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.पंजाबराव देशमुख, बाळासाहेब घुईखेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदनेने मेळाव्याला सुरुवात झाली. वसंतराव घुईखेडकर, राजाभाऊ ठाकरे आदींनी विचार व्यक्त केले.
संचालन प्रगती आखरे, प्रास्ताविक मुख्य आयोजक डॉ.संगीता घुईखेडकर, तर आभार डॉ.कांचन नरवडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शाखेय महिला मराठा-कुणबी समाज व सांस्कृतीक मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
दोनशेच्यावर उपवर-वधूंनी दिला परिचय
मेळाव्यात समाजातील दोनशेच्यावर उपवर-वधूंनी परिचय दिला. नवनिर्वाचित खासदार मधुकरराव कुकडे, वसंतराव घुईखेडकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. डॉ.सुनील चकवे, डॉ. संतोष चतुर यांनी तयार केलेल्या परिचय पुस्तिकेचे प्रकाश्न करण्यात आले.

Web Title: Strategic decision making is essential for promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.