बोगस दिव्यांगांचे अतिक्रमण थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:35+5:30
यवतमाळात नववे महाराष्ट्र कर्ण व मूकबधीर अपंगांचे चर्चासत्र घेण्यात आली. या चर्चासत्राला संपूर्ण राज्यातून कर्ण व मूकबधीर संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. चर्चासत्रामध्ये ज्या लोकांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, अशांच्या रिक्त जागेवर सुदृढ व्यक्ती केवळ अपंग प्रमाणपत्राच्या आधारे अतिक्रमण करीत आहे. राज्यात असे २७०० बोगस अपंग कर्मचारी आढळले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आहेत. मात्र आजपर्यंत कुणीही कारवाई केलेली नाही.

बोगस दिव्यांगांचे अतिक्रमण थांबवा
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अपंगांच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या धडधाकटांची सर्वाधिक संख्या कर्ण व मूकबधिरांच्या नावाने आहे. बोगस प्रमाणपत्र घेऊन खºया अपंगांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याचे काम होते. हा प्रकार तत्काळ थांबवावा अशी एकमुखी मागणी, यवतमाळात रविवारी झालेल्या कर्ण व मूकबधिरांच्या राज्यस्तरीय चर्चासत्रात उमटली.
यवतमाळात नववे महाराष्ट्र कर्ण व मूकबधीर अपंगांचे चर्चासत्र घेण्यात आली. या चर्चासत्राला संपूर्ण राज्यातून कर्ण व मूकबधीर संघटनांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली. चर्चासत्रामध्ये ज्या लोकांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही, अशांच्या रिक्त जागेवर सुदृढ व्यक्ती केवळ अपंग प्रमाणपत्राच्या आधारे अतिक्रमण करीत आहे. राज्यात असे २७०० बोगस अपंग कर्मचारी आढळले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आहेत. मात्र आजपर्यंत कुणीही कारवाई केलेली नाही.
मूकबधिरांना वाहन परवाना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालय अशा व्यक्तींना आजही परवाना देत नाही. कर्ण-मूकबधिरांचे शिक्षण दहावी बारावीपर्यंत मर्यादित आहे. मात्र भरती घेताना पदवीची अट घातली जाते. उच्च शिक्षण नाही, मग अशी अट का लादल्या जाते असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य मूकबधीर मंडळाचे अध्यक्ष मनोज पटवारी, उपाध्यक्ष अनिकेत शेलगावकर, हैदराबादचे संतोष बिरादर, यवतमाळचे अध्यक्ष अंकित जोशी, उपाध्यक्ष मंगेश पांडे, सचिव राहूल राऊत, सतीश भोसरे, पंकज जैन, राहूल वाघमोर, ज्योती पांडे, नैना जैन यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.