दुर्गंधी येतेय म्हणून सूरज धावला आणि समोर दिसला चिमुकल्या मानवीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST2021-12-30T05:00:00+5:302021-12-30T05:00:35+5:30

पोलीस अधीक्षकांनी आरोपीला लवकरच अटक करू, आरोपी येथेच आहे, असे सुनावले होते तेव्हा दीपाली दारात उभी राहून हे ऐकत होती. पोलीस अधीक्षक निघून गेल्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. याचा फायदा घेत दीपालीने दडवून ठेवलेला मानवीचा मृतदेह बाहेर काढला आणि तो शेजारच्या स्वच्छतागृहाजवळ नेऊन ठेवला. मृतदेहाला पाणी सुटले होते तसेच गहूही चिकटला होता. त्यावर ड्रममधील पाणी टाकले.

As the stench was coming, the sun ran away and a human corpse was seen in front of it | दुर्गंधी येतेय म्हणून सूरज धावला आणि समोर दिसला चिमुकल्या मानवीचा मृतदेह

दुर्गंधी येतेय म्हणून सूरज धावला आणि समोर दिसला चिमुकल्या मानवीचा मृतदेह

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : कुऱ्हा डुमणी येथील तीन वर्षीय चिमुरडी मानवीच्या खून प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरूच आहे. बुधवारी आरोपी दीपाली ऊर्फ पुष्पा हिला घटनास्थळी आणून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यास सांगण्यात आले. दीपालीने मानवीचा खून करून मृतदेह दडविला होता. मात्र, दुर्गंधी सुटू लागल्याने २७ डिसेंबरला रात्री ८.३० च्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित होताच मृतदेह जवळच्या बाथरूमजवळ नेऊन ठेवला. त्यावेळी दुर्गंधी आणखीनच वाढली. शेजारीच राहात असलेला चुलत पुतण्या सूरज दुर्गंधीच्या दिशेने धावला. त्याचवेळी वीजपुरवठा सुरू झाला आणि समोर मानवीचा मृतदेह दिसल्याचे बुधवारी पोलिसांना सांगितले. 
गुन्हा उघडकीस येण्याच्या दिवशी पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी घटनास्थळाला भेट दिली होती. त्याचवेळी पोलीस अधीक्षकांनी आरोपीला लवकरच अटक करू, आरोपी येथेच आहे, असे सुनावले होते तेव्हा दीपाली दारात उभी राहून हे ऐकत होती. पोलीस अधीक्षक निघून गेल्यानंतर रात्री ८.३० च्या सुमारास गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला. याचा फायदा घेत दीपालीने दडवून ठेवलेला मानवीचा मृतदेह बाहेर काढला आणि तो शेजारच्या स्वच्छतागृहाजवळ नेऊन ठेवला. मृतदेहाला पाणी सुटले होते तसेच गहूही चिकटला होता. त्यावर ड्रममधील पाणी टाकले. याचवेळी शेजारी राहात असलेल्या सूरजने दीपालीच्या नवऱ्याला काही तरी वास येत आहे, असे सांगितले. यावर दीपालीने घरातील फ्रीज उघडून दाखविला. याच दरम्यान सूरजचा शेजारी स्वप्निल धोटे हाही वास येत असल्याचे ओरडून सांगू लागला. ते ऐकून सूरज घराशेजारच्या बाथरूमकडे धावला. सूरज समोर पाहतो तर मानवीचा मृतदेह. हा प्रकार पाहून तो हक्काबक्का होऊन ओरडू लागला. त्याचवेळी वीजपुरवठा सुरू झाला आणि काही क्षणातच सूरजने मानवीचा मृतदेह पाहिल्याची वार्ता गावात पोहोचली. 
त्यानंतर पोलीस पाटील माला दत्तात्रय माकोडे यांनी पोलीस ठाणेदार पितांबर जाधव यांना याबाबतची माहिती दिली. पोलीस अधीक्षक पाटीलही घटनास्थळाकडे धावले आणि आरोपी दीपाली पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याचे यावेळी प्रात्यक्षिक करून पोलीस पथकासमोर दाखविण्यात आले. या गुन्ह्याच्या प्रात्यक्षिकावेळी ठाणेदार पितांबर जाधव, सहायक पोलीस निरीक्षक शिवराज पवार यांच्यासह दिनेश जाधव, मनोज चव्हाण, सचिन पिसे, संतोष गावंडे, सरपंच मनोज फेंडर, पोलीस पाटील माला दत्तात्रय माकोडे आदी उपस्थित होते.

 

Web Title: As the stench was coming, the sun ran away and a human corpse was seen in front of it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.