Chitra Wagh : यवतमाळ जिल्ह्यात चित्रा वाघ यांचा पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:41 IST2021-02-27T11:41:19+5:302021-02-27T11:41:38+5:30
Chitra Wagh Latest News : यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील शंकर नगर येथील संजय राठोड समर्थक महिलांनी चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप देऊन पुतळा जाळला.

Chitra Wagh : यवतमाळ जिल्ह्यात चित्रा वाघ यांचा पुतळा जाळला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील शंकर नगर येथील संजय राठोड समर्थक महिलांनी चित्रा वाघ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा चोप देऊन पुतळा जाळला. यावेळी निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या.
संजय राठोड यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे आरोप अद्याप सिद्ध झाले नाहीत. असे असले तरी चित्रा वाघ ह्या स्वतः ला न्यायाधीश समजतात आणि संजय राठोड यांना अनुचित संबोधतात असा आरोप यावेळी करण्यात आला. चीत्रा वाघ यांनी आमचे नेते संजय भाऊ राठोड यांच्या बद्दल खालच्या स्तरावर जाऊन टीका करू नये, अन्यथा चित्रा वाघ यवतमाळ जिल्ह्य़ात आल्यास नक्कीच त्यांच्याच भाषेत उत्तर दिल्या जाणार असल्याचे महिलांनी यावेळी सांगितले,