राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘एसपीं’ना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:00:24+5:30

अक्षय पिपलवार या युवकाने अश्लील भाषेचा वापर करून पोस्ट व्हायरल केली. त्याच्याविरूद्ध भादंवि २९४, ४९९, ५००, ५०१, ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी आहे. या पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहे व अशा पोस्ट केल्याने अशांतता निर्माण होऊ शकते, असेही निवेदनात नमूद केले.

Statement of NCP to SP | राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘एसपीं’ना निवेदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘एसपीं’ना निवेदन

ठळक मुद्देगृहमंत्र्यांवर आक्षेपार्ह पोस्टप्रकरण : आरोपीला अटक करून गुन्हे नोंदविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल व्यक्तिगत टीकाटिप्पणी व आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियात पोस्ट करण्यात आला. यातील दोषींचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्याकडे करण्यात आली.
अक्षय पिपलवार या युवकाने अश्लील भाषेचा वापर करून पोस्ट व्हायरल केली. त्याच्याविरूद्ध भादंवि २९४, ४९९, ५००, ५०१, ५०४ या कलमान्वये गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली जावी, अशी मागणी आहे. या पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहे व अशा पोस्ट केल्याने अशांतता निर्माण होऊ शकते, असेही निवेदनात नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग यांच्या नेतृत्त्वात निवेदन देण्यात आले. अशा प्रवृत्तींना आळा बसण्यासाठी तात्काळ कठोर कारवाई केली जावी. जेणेकरून समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, असेही नमूद करण्यात आले.
 

Web Title: Statement of NCP to SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.