सावळी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खासदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:19 IST2021-03-04T05:19:42+5:302021-03-04T05:19:42+5:30

सावळी सदोबा : आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील माळेगाव, ईचोरा, सुभाष नगर, वरुड, दातोडी व दहेली येथील रस्त्यांची दयनीय ...

Statement to MPs for repair of roads in the shadow area | सावळी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खासदारांना निवेदन

सावळी परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खासदारांना निवेदन

सावळी सदोबा : आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील माळेगाव, ईचोरा, सुभाष नगर, वरुड, दातोडी व दहेली येथील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती तातडीने करण्याबाबत खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन देण्यात आले.

सावळी सदोबा परिसरातील गावांमधील माजी सरपंच, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांना याविषयीचे निवेदन दिले. सावळी परिसरातील दयनीय अवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भात हे निवेदन देण्यात आले असून, गत १५ वर्षांपासून सावळी सदोबा परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ग्रामस्थांना या रस्त्यांवरुन प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी निवदेनातून करण्यात आली आहे.

याशिवाय परिसरातील इतरही समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार बाळू भाऊ धानोरकर यांच्यासह काँग्रेसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, बाळासाहेब शिंदे, अहेमद तंवर, डॉ. रामचरण चव्हाण, अरीज बेग, राजू बुटले उपस्थित होते.

Web Title: Statement to MPs for repair of roads in the shadow area