मुकुटबन येथील स्टेट बँकेचे एटीएम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:52 AM2021-09-16T04:52:40+5:302021-09-16T04:52:40+5:30

मुकुटबन परिसरात कोळसा खाण, सिमेंट कंपनी असल्यामुळे व्यापार वाढला आहे. त्या दृष्टीने बँकेचे व्यवहारही वाढले आहे. मात्र, येथील स्टेट ...

State Bank ATM at Mukutban closed | मुकुटबन येथील स्टेट बँकेचे एटीएम बंद

मुकुटबन येथील स्टेट बँकेचे एटीएम बंद

googlenewsNext

मुकुटबन परिसरात कोळसा खाण, सिमेंट कंपनी असल्यामुळे व्यापार वाढला आहे. त्या दृष्टीने बँकेचे व्यवहारही वाढले आहे. मात्र, येथील स्टेट बँकेत कर्मचारी कमी असून, व्यवहार मात्र कासवगतीने सुरू आहे. बँकेत दररोज अलोट गर्दी असते, परंतु त्या गर्दीत कोणीही मास्क लावलेले दिसत नाही. बऱ्याच दिवसांपासून एटीएमही बंद अवस्थेतच आहे. व्यवस्थापकही सुट्टीवर असून, कर्मचारीही कामाला बराच वेळ लावतात. येथे देवाण-घेवाणचे वेगवेगळे काउंटर नसून सर्वांची गर्दी एकाच काउंटर होते. कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. ग्राहकसेवा केंद्रही बंद केल्याचे समजते. त्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडत असून, संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन बँकेच्या कारभारात सुधारणा करावी व बंद असलेले एटीएम सुरू करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: State Bank ATM at Mukutban closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.