शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा

By Admin | Updated: June 23, 2017 01:52 IST2017-06-23T01:52:55+5:302017-06-23T01:52:55+5:30

शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,

Stand firmly with farmers | शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा

शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा

माणिकराव ठाकरे : महागाव येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा मुद्दा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेवून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विधान परिषदेचे उपाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांनी येथे केले.
स्थानिक विश्रामगृहात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार राजीव सातव, काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, माजी आमदार विजय खडसे, शिवाजीराव देशमुख सवनेकर, शैलेश कोपरकर, आसिफ सुरैया, बबलू सुरैया, शे.इस्माईल, इमरान पठाण उपस्थित होते. आमदार ठाकरे म्हणाले, शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु अद्यापही त्यात स्पष्टता नाही. शेतकऱ्यांना दहा हजार रुपये देण्याचे घोषित करण्यात आले. त्याचाही गोंधळ सुरू आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीसाठी काँग्रेसने वेळोवेळी आंदोलने केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नांदेड, नागपूर, सोलापूर या ठिकाणी मोर्चे काढले. काँग्रेस पूर्वीपासूनच कर्जमाफीचा मुद्दा लावून धरत आहे. त्यामुळेच सरकारने कर्जमाफी केल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीला काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Stand firmly with farmers