शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

मृत शेतकऱ्याच्या घरात प्रशासनाचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 23:21 IST

शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सावळेश्वर गाव प्रचंड अस्वस्थ आहे. प्रशासन मात्र ही शेतकरी आत्महत्या नसून अपघातच आहे, हे दाखविण्यासाठी मरणदारी तळ ठोकून बसले आहे.

ठळक मुद्देकाहीही बोलू नका : आत्महत्येला अपघात दाखविण्याचा प्रयत्न, गाव मात्र अस्वस्थ

अविनाश खंदारे ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर तालुक्यातील सावळेश्वर गाव प्रचंड अस्वस्थ आहे. प्रशासन मात्र ही शेतकरी आत्महत्या नसून अपघातच आहे, हे दाखविण्यासाठी मरणदारी तळ ठोकून बसले आहे. मृताच्या वारसांनी कोणाशीही काहीही बोलू नये, यासाठी प्रचंड दबाव आणला जात असल्याची गंभीर बाब ‘लोकमत’ चमूच्या प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आली.सावळेश्वर गावात १४ एप्रिल रोजी माधवराव रावते या वृद्ध शेतकऱ्याने शेतात सरण रचून आत्महत्या केली. मात्र सावळेश्वर हे मुख्यमंत्र्यांचे दत्तक गाव असल्याने स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी ही शेतकरी आत्महत्या नव्हेच, असा कांगावा सुरू केला. माधवरावांच्या मृत्यूनंतर तब्बल दोन दिवसांनी ही बाबपुढे आली. १६ एप्रिल रोजी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे देवानंद पवार व कार्यकर्त्यांनी या गावात धडक दिल्यावर जळून खाक झालेल्या माधवरांच्या कलेवराला वाचा फुटली. मात्र १७ एप्रिलला उपविभागीय अधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन या शेतकऱ्याचे कर्ज माफ झाल्याचे सांगितले. प्रत्यक्ष गावकऱ्यांचे म्हणणे वेगळे आहे. ते म्हणाले. आमच्या गावात २५० शेतकरी कर्जमाफीत बसतात. पण एकालाही शासनाने आतापर्यंत कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र दिले नाही. माधवराव गेल्यानंतर त्यांचे कर्ज माफ झाल्याचे सांगून काय फायदा?‘लोकमत’ चमू माधवराव रावते यांच्या घरी पोहोचली, तेव्हा त्यांच्या घरात तलाठी, पोलीस पाटील, मुख्यमंत्री दूत यांनी ठिय्या दिलेला होता. माधवरावचा मुलगा गंगाधर काही बोलू इच्छित असला तरी या अनामिक दबावामुळे तो बोलू शकत नव्हता. गावकऱ्यांनी सांगितलेली कहाणी भयंकर आहे. माधवरावचे वावर पूर्णत: मुरमाड जमिनीचे आहे. त्याच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी तर जमिनी कसणे सोडून दिले आहे. पण त्यांना शेतीविना पर्याय नव्हता. कर्जमाफी जाहीर झाली, पण नव्या कर्जाचे काय? बोंडअळीच्या मदतीत त्याचे नाव आले, पण मदत कुठे मिळाली? असे अनेक प्रश्न गावकºयांनी उपस्थित केले.गावातल्या कार्यकर्त्यावर रोषमाधवराव रावते यांची आत्महत्या झाल्यापासूनच गावातील एक भाजपा कार्यकर्ता सतत ही आत्महत्या नसून अपघातच आहे, असे सर्वांना सांगत आहे. आता गावकरीही त्या कार्यकर्त्याविरुद्ध रोष व्यक्त करू लागले आहे. माधवराव पुंजाणे पेटवताना जळले, तर मग त्यांच्या चपला, काठी, चष्मा कसे बाजूला सलामत राहिले, असा या गावकºयांचा प्रश्न आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या