कळंब बसस्थानकात एसटीने वृद्धेला चिरडले

By Admin | Updated: July 29, 2016 02:14 IST2016-07-29T02:14:38+5:302016-07-29T02:14:38+5:30

येथील बसस्थानकावर वृद्ध महिला बसच्या मागच्या चाकात चिरडून ठार झाल्याची घटना गुरुवारी ...

ST grew old in the bus station in Kalamb bus station | कळंब बसस्थानकात एसटीने वृद्धेला चिरडले

कळंब बसस्थानकात एसटीने वृद्धेला चिरडले

कळंब : येथील बसस्थानकावर वृद्ध महिला बसच्या मागच्या चाकात चिरडून ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली.
सुलताना बेगम शेख मेहबूब (६५) रा. वणी असे मृत महिलेचे नाव आहे. सुलताना बेगम या वणी येथून कळंब येथे आपल्या नातेवाईकाकडे येत होत्या. कळंब बसस्थानकावर उतरल्यानंतर अचानक बसच्या मागील चाकात आल्या. चाक अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. सदर बस राळेगाव आगाराची असून बस चालकाविरुद्ध कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कळंब येथील बसस्थानकात मोठ्ठाले खड्डे पडले असून त्यामुळे बसेस उसळून असे अपघात होतात. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: ST grew old in the bus station in Kalamb bus station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.