लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात १६ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या काळात जिल्हा पोलीस दलाने यशस्वीरीत्या परिस्थिती हाताळून कायदा व सुव्यवस्था कायम राखली. आता ८ मार्चला शब्बेरात असल्याने राज्य राखीव दलाच्या शंभर जवानांची तुकडी बोलाविण्यात आली आहे. पुसद, उमरखेड, यवतमाळात ९ एप्रिलपर्यंत विशेष बंदोबस्त आहे.मंगळवारी सायंकाळी पोलिसांच्या संयुक्त पथकांनी यवतमाळ शहरातून पथसंचलन केले. यामध्ये एसआरपीएफ कंपनी, आरसीपी तुकडी, स्पेशल कमांडो यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.कळंब चौकात स्वागतपोलिसांचे पथक संचलन करीत कळंब चौक परिसरात पोहोचताच नागरिकांनी दुतर्फा उभे राहून त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. यावेळी अनेक जण घराच्या छतावरुन फुले फेकत होती. टाळ्यांचा गजर करून पोलीस दलाचे स्वागत करण्यात आले. या पथसंचलनाचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर, शहर ठाणेदार धनंजय सायरे, अवधूतवाडीचे ठाणेदार आनंद वागतकर, लोहारा ठाणेदार सचिन लुले यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी या पथसंचलनात सहभागी झाले होते.
यवतमाळात एसआरपीएफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST
पोलिसांचे पथक संचलन करीत कळंब चौक परिसरात पोहोचताच नागरिकांनी दुतर्फा उभे राहून त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. यावेळी अनेक जण घराच्या छतावरुन फुले फेकत होती. टाळ्यांचा गजर करून पोलीस दलाचे स्वागत करण्यात आले. या पथसंचलनाचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी केले.
यवतमाळात एसआरपीएफ
ठळक मुद्देशब्बेरातचा बंदोबस्त : पोलिसांवर फुलांचा वर्षाव