शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक गावात विशेष महिला ग्रामसभा

By admin | Updated: March 8, 2015 02:04 IST

जिल्ह्यातील नऊशे ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीमध्ये महिलांच्या मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील नऊशे ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीमध्ये महिलांच्या मतांची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक महिला दिनी ८ मार्च रोजी प्रत्येक गावात महिलांची ग्रामसभा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशावरून हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. गावाच्या विकासात घरच्या कारभारणीने पुढाकार घ्यावा यासाठी जनजागृती केली जात आहे. याची सुरूवात महिला दिनापासून केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावात विशेष महिला ग्रामसभा बोलविण्यात आली आहे. आजही ग्रामीण भागात महिलांच्या मतदानाची टक्केवारी प्रचंड कमी आहे. महिलांनी उत्स्फुर्तपणे आपला अधिकार वापरावा यावर भर दिला जात आहे. येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, त्यांच्या मतदानाने गावाचा विकास कसा साधता येईल यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. या विशेष ग्रामसभेत महिला सक्षमीकरण, पाणी गुणवत्ता शौचालय बांधकाम, महिलांचे आरोग्य, मतदार नोंदणीत महिलांची संख्या वाढविणे, महिलांचा मतदानाचा हक्क या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. यासाठी गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)