गुन्हे उघड आणण्याच्या गतीवर ‘एसपी’च नाखूश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:00 AM2019-12-10T06:00:00+5:302019-12-10T06:00:03+5:30

जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे घटते प्रमाण याबाबत एसपींनी तीव्र चिंता व्यक्त केली. गुन्हा घडणारच नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याचे, त्यासाठी रात्रगस्त, सतर्कता, गुन्हेगारांची तपासणी, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.

'SP' unhappy with the pace of crime disclosure | गुन्हे उघड आणण्याच्या गतीवर ‘एसपी’च नाखूश

गुन्हे उघड आणण्याच्या गतीवर ‘एसपी’च नाखूश

googlenewsNext
ठळक मुद्देडिटेक्शन वाढवा : ३१ डिसेंबरपूर्वी टार्गेटपूर्तीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मालमत्तेचे गुन्हे प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्या तुलनेत हे गुन्हे उघडकीस येण्याचे (डिटेक्शन) प्रमाण कमी आहे. डिटेक्शनच्या या गतीवर खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार हेसुद्धा समाधानी नाहीत. त्यामुळेच सोमवारी झालेल्या क्राईम मिटींगमध्ये त्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हाभरातील ठाणेदारांना दिले.
पोलीस मुख्यालयात ठाणेदारांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी सर्व ठाणेदारांना ३१ डिसेंबर या टार्गेटपूर्तीच्या डेडलाईनचे स्मरण करून दिले. मटका, जुगार, दारू, अंमली पदार्थांची तस्करी, प्रतिबंधित गुटख्याचा पुरवठा, जनावरांची तस्करी, प्रतिबंधात्मक कारवाई, वाहन चालान करणे अशा वेगवेगळ्या मुद्यावर वार्षिक उद्दीष्ट निश्चित करून देण्यात आले होते. या उद्दीष्टपूर्तीसाठी अवघे तीन आठवडे शिल्लक असल्याने वेगाने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उद्दीष्टपूर्तीत जिल्हा कुठेही मागे राहू नये, कामगिरी सरस ठरावी अशी अपेक्षा एसपींनी व्यक्त केली.
जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि गुन्हे उघडकीस आणण्याचे घटते प्रमाण याबाबत एसपींनी तीव्र चिंता व्यक्त केली. गुन्हा घडणारच नाही या दृष्टीने प्रयत्न करण्याचे, त्यासाठी रात्रगस्त, सतर्कता, गुन्हेगारांची तपासणी, प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याचे निर्देश देण्यात आले. एवढे करूनही गुन्हा घडला तर तो तातडीने कसा उघडकीस आणता येईल, त्यातील आरोपींना कशी लवकर अटक करता येईल या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हिस्ट्रीशिटर, क्रियाशील गुन्हेगार यांची नियमित चेकींग करावी, दंडाधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या तडीपारीच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करावा, सामान्य नागरिकांशी सौजन्याने वागावे, पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना सभ्यतेची वागणूक द्यावी, न्यायालयात दाखल होणाºया खटल्यांमध्ये आरोपींना अधिकाधिक शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करावे, सरकारी पंच-साक्षीदारांना न्यायालयात उपस्थित ठेवावे, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, अशाही सूचना देण्यात आल्या.

क्राईम मिटींगवर अधिवेशनाचे सावट
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनाची हूरहूर क्राईम मिटींगमध्ये पहायला मिळाली. अधिवेशन काळात जिल्ह्यात कोणतेही वादग्रस्त प्रकरण उपस्थित राहणार नाही, गंभीर गुन्हा घडणार नाही या दृष्टीने सतर्क राहण्याच्या आणि आणखी खबरदारी घेण्याच्या सूचना ठाणेदारांना देण्यात आल्या.
‘सीसीटीएनएस’च्या पोलिसांचा सत्कार
‘सीसीटीएनएस’ (क्राईम अ‍ॅन्ड क्रिमीनल ट्रॅकिंग नेटवर्क अ‍ॅन्ड सिस्टीम) प्रणालीमध्ये जिल्हा पोलीस दलाने २०१७ पाठोपाठ २०१९ या वर्षातसुद्धा राज्यातून पहिला क्रमांक मिळविला. या यशात वाटेकरी असलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्यातील संबंधित दोन कर्मचाºयांना सोमवारी क्राईम मिटिंगमध्ये प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन गौरविण्यात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार व अन्य अधिकाºयांनी या पोलिसांसोबत स्नेहभोजन घेतले.

Web Title: 'SP' unhappy with the pace of crime disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस