शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन काळे ठिक्कर, कापसाची बोंडे सडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 05:00 IST

अगदी हाती येणारे पीक पावसाने मातीमोल केले. अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच ओला झाला असून सोयाबीनदेखील काळे पडल्याने उत्पन्नात फार मोठी घट येण्याची चिन्हे आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी बँकांसह खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन खरीप हंगामाची सोय केली. यंदा चांगले उत्पादन होईल, असा अंदाज होता. शेतकऱ्यांनाही तीच आशा होती. पिकाची अवस्था अतिशय चांगली होती. मात्र नियतीला ते पाहावले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे बळीराजा अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. पावसामुळे सोयाबीनच्या शेंगा काळ्या ठिक्कर पडल्या आहेत, तर कापसाची बोंडेदेखील सडून गेली आहेत. हातात येणारे पीक डोळ्यासमोर मातीमोल झाल्याने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. वणी तालुक्यात या पावसामुळे पिकांचे नुकसान कोट्यवधीच्या घरात आहे. वणी उपविभागातील वणीसह मारेगाव या दोन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक शेतात कापूस फुटून होता, तर सोयाबीन कापणीवर आले होते. काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणी करून त्याच्या गंज्या शेतात उभ्या केल्या होत्या. अशातच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आणि शेतकरी हादरून गेला. अगदी हाती येणारे पीक पावसाने मातीमोल केले. अनेक शेतकऱ्यांचा कापूस शेतातच ओला झाला असून सोयाबीनदेखील काळे पडल्याने उत्पन्नात फार मोठी घट येण्याची चिन्हे आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी बँकांसह खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन खरीप हंगामाची सोय केली. यंदा चांगले उत्पादन होईल, असा अंदाज होता. शेतकऱ्यांनाही तीच आशा होती. पिकाची अवस्था अतिशय चांगली होती. मात्र नियतीला ते पाहावले नाही. या भागात गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. २० सप्टेंबरच्या रात्रीपासून तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. २१ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत सुरूच होता. त्यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. शेकडो हेक्टर शेतात पाणी शिरले. अनेक शेतांमधील पिकात अजूनही पाण्याचे डबके साचून आहे. त्यामुळे पिकांवर बुरशीजन्य आजाराचे आक्रमण होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. अर्ली व्हरायटीची बियाणे पेरणाऱ्या शेतकऱ्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. दोन वर्षांपूर्वी ऐन पिके काढणीवर असताना वणी तालुक्यात असाच पाऊस झाला. त्यावेळीदेखील शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. यंदा त्याहीपेक्षा बिकट स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी निसर्गाच्या प्रकोपात सातत्याने पिकांचे नुकसान होत आहे. कृषी विभागातर्फे पंचनामे केले जातात. मात्र नुकसान लाखोत असले तरी मदत मात्र पाच ते १० हजारांची दिली जाते. निसर्गाच्या या चक्रात शेतकरी सातत्याने भरडला जात आहे. एकीकडे शेतमालाला भाव मिळत नाही, दुसरीकडे निसर्गाच्या प्रकोपात पिकांची माती होते. अशा परिस्थितीत आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. यावर्षी पिकांचे पावसामुळे जेवढे नुकसान झाले, तेवढा मोबदला सरकारने द्यावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

औंदाही पावसानं चांगलीच सोय लावली जी...! - कापूस, सोयाबीन पिकाची स्थिती चांगली होती. मात्र परतीच्या पावसानं पिकाची चांगलीच सोय लावली जी...! आता आम्हा शेतकऱ्यांनी जगाचं तरी कसं, असा केविलवाणा प्रश्न मांगरूळ येथील शेतकरी प्रभाकर डाखरे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

 

टॅग्स :agricultureशेती